नवी दिल्ली, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्येचं पाऊल उचलत सर्वांनाच धक्का दिला. रविवारी सुशांतनं वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत गेले 6 महिने नैराश्येत होता, यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बायोपीकमध्ये सुशांतनं धोनीची (Mahendra singh Dhoni) भुमिका साकारली होती. 2019मध्ये आलेल्या छिछोरे या सिनेमात सुशांत अखेरचा पडद्यावर दिसला. मात्र आजही लोकांच्या कायम लक्षात आहे तो धोनी (Mahendra singh Dhoni)म्हणून. एसएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) या सिनेमात सुशांतनं हूबेहूब धोनी पडद्यावर आणला.
धोनीच्या बायोपीकमध्ये काम करण्यासाठी सुशांतनं विशेष मेहनत घेतली होती. यासाठी सुशांत दोन ते तीनवेळा भेटला होता. यावेळी धोनीनं सुशांतचं विशेष कौतुक केलं होतं. सुशांतनं धोनीच्या बॅटिंग स्टाइलपासून ते त्याच्या शॉटचाही अभ्य़ास केला होता. यासाठी सुशांतनं धोनीचे सर्व व्हिडीओ 100वेळा पाहिले होते. याच दरम्यान धोनी आणि सुशांत यांच्या चांगले संबंध होते. धोनीला सुशांतच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याला या गोष्टीवर विश्वासही बसला नाही. धोनी दोन दिवस धक्क्यात आहे.
वाचा-पडद्यावर हूबेहूब धोनी साकारणाऱ्या सुशांतचा हा VIDEO होत आहे VIRALअशी होती धोनीची प्रतिक्रिया
सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला, अद्यापही सुशांतनं असे का केले, हा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्य मनात आहे धोनीला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो स्तब्ध झाला. रविवारी सुशांतने जगाला निरोप दिला होता आणि xtratime.in च्या मते, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाचे निर्माते नीरज पांडेने धोनीला फोन करून याबाबत माहिती दिली. याबद्दल बोलताना नीरज पांडे म्हणाले की, धोनीला सांगण्याआधी त्यांनी मिहिर दिवाकर आणि अरुण पांडे या दोन जवळच्या मित्रांना फोन केला. नीरजने सांगितले की त्याने धोनीला ही बातमी कळताच तो शॉक झाला. हादरून गेला.
वाचा-सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'माझ्याही मनात आत्महत्या...'सुशांतचा फॅन होता धोनी
बायोपिकसाठी परिश्रम व सुशांतचा अभिनय धोनी त्याचा फॅन झाला होता. इतकेच नव्हे तर सुशांतने त्याच्या फलंदाजीनेही धोनीला प्रभावित केले. विशेषत: धोनीला सुशांतचती हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची पद्धत आवडली. सुशांतला क्रिकेटचे खास आकर्षण होते, कारण त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. तो राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रिकेट खेळला, पण नंतर कुटुंबाच्या अपेक्षेनुसार इंजिनिअरिंग केले. सुशांतच्या फलंदाजीचे कौतुक सचिन तेंडुलकरनेही केले होते. सुशांतनं किरण मोरे यांच्याकडून धोनीच्या बायोपीकसाठी प्रशिक्षण घेतले होते.
वाचा-सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.