Home /News /sport /

Sushant singh Rajput Suicide: पडद्यावर हूबेहूब धोनी साकारणाऱ्या सुशांतचा हा VIDEO होत आहे VIRAL

Sushant singh Rajput Suicide: पडद्यावर हूबेहूब धोनी साकारणाऱ्या सुशांतचा हा VIDEO होत आहे VIRAL

2019मध्ये आलेल्या छिछोरे या सिनेमात सुशांत अखेरचा पडद्यावर दिसला. मात्र आजही लोकांच्या कायम लक्षात आहे तो धोनी (Mahendra singh Dhoni)म्हणून.

    मुंबई, 14 जून : सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) या प्रतिभावंत कलाकारानं आज राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली. 2019मध्ये आलेल्या छिछोरे या सिनेमात सुशांत अखेरचा पडद्यावर दिसला. मात्र आजही लोकांच्या कायम लक्षात आहे तो धोनी (Mahendra singh Dhoni)म्हणून. एसएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) या सिनेमात सुशांतनं हूबेहूब धोनी पडद्यावर आणला. धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांत शिवाय कोणत्याच कलाकारानं न्याय दिला नसता, अशी प्रतिक्रीय धोनीनं दिली होती. आजही माही मार रहा है, असं म्हटलं की धोनी ऐवजी सुशांत आठवतो. धोनीचा प्रवास मांडताना अगदी धोनी सारखा हेलिकॉप्टर शॉटही तो खेळला. त्यासाठी त्यानं विशेष प्रशिक्षणही घेतलं. मात्र आज पडद्यावरच्या धोनीनं केलेली आत्महत्या चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीनं 2011 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले शॉट आणि सुशांतचे शॉट यांचा कोलाज करण्यात आला आहे. सुशांत किती हुबेहुब धोनीसारखा खेळतो, हे या व्हिडीओवरूनच कळतं. वाचा-सुशांतची धक्कादायक एक्झिट! धोनीच्या CSK नं दिली पहिली प्रतिक्रिया, असा शेवट... वाचा-डिप्रेशनमध्ये होता सुशांत; Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची नुकतीच झाली एंगेजमेंट सुशांतच्या आत्महत्येनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघानेही शोक व्यक्त केला. वाचा-पार्टी, मॅनेजरची आत्महत्या आणि आज सुशांत, काय आहे नेमकं कनेक्शन? सुशांतच्या निधनानंतर अद्याप धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र त्याचा आयपीएल संघ CSK नं मात्र ऑफिशिअल ट्विटरवरून ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सुशांतचा या सिनेमातील फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिल, असा शेवट अपेक्षित नव्हता. रिलेशनशिप या मालिकेद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एमएस धोनी व्यतिरिक्त, काय पो चे, शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ आणि त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. वाचा-सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा जेवण करत होते वडील, टीव्ही लावला आणि...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या