मुंबई, 1 मे: मुंबईनं राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. सलग आठ पराभवानंतर मुंबईला रोहितच्या वाढदिवशी या सिझनमधील पहिलं यश मिळालं. या पहिल्या यशानंतर सुर्यकुमार यादवने(Suryakumar Yadav) मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या शानदार फलंदाजीने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2022 मध्ये पहिला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने 51 रन्सची खेळी केली. या कामगिरीनंतर त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
...तर आमची गोष्ट थोडी वेगळी असती, विजयानंतर मुंबईचा 'हिटमॅन' काय म्हणाला?
हा पुरस्कार मिळाल्यानंतर सुर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यासाठी शेवटपर्यंत खेळणं खूप महत्त्वाचं होतं. मात्र नंबर 3 वर माझं काम खेळाला पुढे घेऊन जाणं होतं, जिथे रोहित शर्मा सोडून गेला होता.
मात्र तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, त्यामुळे मी खूप खूश आहे. एक चांगलं वातावरण तयार होण्यासाठी एक मोठा विजय गरजेचा होता. आता आम्ही पुढच्या सामन्यांची वाट पाहतोय, असंही सुर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, “मला सर्व स्थानांवर फलंदाजीचा आनंद मिळतो, परंतु मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो कारण मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना माझ्या डावाला गती देऊ शकतो आणि खेळ पुढे नेऊ शकतो. मात्र, मी खूप लवचिक आहे आणि खूप फलंदाजी करू शकतो. आरआर विरुद्धच्या विजयामुळे सकारात्मकता येईल आणि लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, सराव सत्रातही आम्ही एकमेकांच्या सहवासाचा खूप आनंद घेत आहोत.” असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav