मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: गुवाहाटीत 'सूर्या' वादळाचा तडाखा... दक्षिण आफ्रिकन बॉलर्स उद्ध्वस्त, केले हे विक्रम

Ind vs SA: गुवाहाटीत 'सूर्या' वादळाचा तडाखा... दक्षिण आफ्रिकन बॉलर्स उद्ध्वस्त, केले हे विक्रम

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

Ind vs SA: सूर्यकुमारनं गुवाहाटीत 360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करताना अवघ्या 22 बॉल्समध्ये 5 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावा कुटल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: टीम इंडिया आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे यावर गुवाहाटीतल्या सामन्यात शिक्कामोर्तब झालं. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20त 237 धावांचा डोंगर उभा केला. त्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली  या अनुभवी खेळाडूंनी दमदार फटकेबाजी केली. पण त्याचबरोबर मुंबईच्या सूर्यकुमार यादवनं या सामन्यात वादळी खेळी करुन रेकॉर्डबुकमध्ये अनेक रेकॉर्ड्सची नोंदही केली. सूर्यकुमारनं गुवाहाटीत 360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करताना अवघ्या 22 बॉल्समध्ये 5 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावा कुटल्या.

सूर्याचं वेगवान अर्धशतक

रोहित आणि राहुलच्या दमदार सलामीनंतर सूर्यकुमार मैदानात आला. पण येताच त्यानं दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीवर आक्रमण केलं. त्यानं मैदानातल्या प्रत्येक बाजूला फटकेबाजी केली. आणि अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. भारताकडून टी20 क्रिकेटमधलं हे तिसरं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. याआधी युवराज सिंगनं 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 बॉलमध्ये हाफ सेन्च्युरी ठोकली होती. त्यानंतर लोकेश राहुलनं 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.

सूर्यकुमारचे एक हजार टी20 रन्स

सूर्यकुमार यादवनं याच सामन्यात टी20 कारकीर्दीत 1 हजार धावा पूर्ण केल्या. त्यानं अवघ्या 33 सामन्यात ही कामगिरी बजावली. त्यामुळे विराट कोहली आणि लोकेश राहुलनंतर सूर्यकुमार यादव हा सर्वात जलद 1 हजार टी20 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला.

टीम इंडियाचा धावांचा डोंगर

दरम्यान रोहित शर्मानं लोकेश राहुलसह भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली. रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजनं या दोघांनाही माघारी धाडलं.

पण त्यानंतर सूर्यकुमार आणि विराट कोहलीनं टीम इंडियाला 200 चा पल्ला गाठून दिला. विराटनंही आपला फॉर्म कायम राखताना 28 बॉल्समध्ये नाबाद 49 धावा केल्या. तर अखेरच्या ओव्हर्समध्ये मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनंही फटकेबाजी करताना 7 बॉलमध्ये नाबाद 17 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतानं अखेरीस 3 बाद 237 धावांचा डोंगर उभा केला.

First published:

Tags: Cricket news, Sports, T20 cricket, T20 world cup 2022