मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'सूर्या'स्त झाला असता, पण लॉकडाऊनमध्ये या मित्राने बदललं सूर्यकुमार यादवचं आयुष्य

'सूर्या'स्त झाला असता, पण लॉकडाऊनमध्ये या मित्राने बदललं सूर्यकुमार यादवचं आयुष्य

गेली तीन वर्ष आयपीएल (IPL) आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर त्याच्या कष्टाचं फळ मिळालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाक्यात पाऊल टाकल्यानंतर सूर्यकुमार यादव त्याचा मुंबई इंडियन्सच्या टीममधला मित्र कृणाल पांड्याबाबत (Krunal Pandya) भरभरून बोलला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मार्च : गेली तीन वर्ष आयपीएल (IPL) आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर त्याच्या कष्टाचं फळ मिळालं. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये सूर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड झाली. सूर्यकुमारनेही त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. आपल्या पहिल्याच टी-20 इनिंगमध्ये सूर्यानं धमाकेदार अर्धशतक केलं. सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली पहिलीच रन सिक्स मारून पूर्ण केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाक्यात पाऊल टाकल्यानंतर सूर्यकुमार यादव त्याचा मुंबई इंडियन्सच्या टीममधला मित्र कृणाल पांड्याबाबत (Krunal Pandya) भरभरून बोलला आहे. कृणाल पांड्याने अडचणीच्या काळात मला कशी मदत केली, हे सूर्यकुमारने सांगितलं आहे.

'केपी माझ्या भावा, मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर माझ्या खेळाला फायदा झाला. पण मी आलो तेव्हा तुझं बाजूला असणं दिलासादायक होतं. लॉकडाऊनमध्ये झालेल्या आपल्या चर्चा, मी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं, यासाठी तुझा आग्रह. माझ्या फिटनेससाठी तू केलेली मदत. माझे धन्यवादही कमी पडतील. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं ट्वीट सूर्यकुमार यादवने केलं आहे.

आयपीएलमध्ये आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवने अनेकवेळा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला, पण त्याची टीममध्ये निवड होत नव्हती. एवढी चांगली कामगिरी करूनही टीममध्ये निवड होत नसल्यामुळे आपल्याला नैराश आल्याचं सूर्यकुमारने याआधी सांगितलं होतं. टीममध्ये निवड झाली नाही की आपण समुद्रावर जाऊन एकटेच बराच वेळ बसायचो, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला होता.

सूर्यकुमार यादवसोबतच कृणाल पांड्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये कृणालने अर्धशतकी खेळी केली. 26 बॉलमध्येच कृणालने अर्धशतक केल. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात जलद अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम कृणाल पांड्याच्या नावावर झाला आहे.

First published:

Tags: India vs england, IPL 2021, Krunal Pandya, Mumbai Indians, Suryakumar yadav