माऊंट माँगानुई, 19 नोव्हेंबर: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं यंदाच्या वर्षात दुसरं शतक झळकावलं. माऊंट माँगानुईच्या दुसऱ्या टी20त सूर्यकुमारनं किवी गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्यानं अवघ्या 51 बॉलमध्ये 111 धावांची खेळी उभारली. त्यामुळे टीम इंडियाला 6 बाद 191 धावांचा डोंगर उभारता आला. सूर्यकुमारनं टी20 क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे दुसरं शतक ठरलं. याआधी इंग्लंड दौऱ्यात त्यानं 117 धावांची खेळी केली होती.
Second T20 Hundred Well Played Sky ♥️#SuryaKumarYadav#Sky #INDvsNZ pic.twitter.com/tBB7DOg9yu
— Sayed Mehmood Rizvi (@MehmoodRizvi) November 20, 2022
जबरदस्त 'सूर्या'
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं आजच्या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. ढगाळ वातावरण आणि पाऊस अशा वातावरणाचा फायदा घेण्याचा किवी कॅप्टनचा प्लॅन होता. पण भारतीय फलंदाजांनी हा प्लॅन उधळून लावला. किवींवर आक्रमण चढवलं ते सूर्यकुमार यादवनं. सूर्यानं पहिल्या बॉलपासून किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्याच्या नाबाद 111 धावांच्या इनिंगमुळे भारताला धावांचा 191 डोंगर उभारता आला. सूर्याच्या या इनिंगमध्ये तब्बल 11 फोर आणि 7 सिक्सर्सचा समावेश होता.
A fantastic 💯 for @surya_14kumar off 49 deliveries. 💪👏🔥#NZvIND pic.twitter.com/BgscaMb9iU
— BCCI (@BCCI) November 20, 2022
हेही वाचा - Ind vs NZ: बीसीसीआय हे चाललंय काय? टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कधी मिळणार न्याय?
टीम साऊदीची हॅटट्रिक
दरम्यान सूर्यकुमारचा शो सुरु असतानाच शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं कमाल केली. शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव नॉन स्ट्राईकवरच राहिला. पण साऊदीनं पंड्या, हुडा आणि सुंदरला माघारी धाडून टी20 क्रिकेटमध्ये दुसरी हॅटट्रिक नोंदवली. या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या या अनुभवी बॉलरनं फक्त 5 धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket