• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सूर्याच्या IPL टीममध्ये स्थान नाही, धक्का बसलेला वॉर्नर म्हणाला...

सूर्याच्या IPL टीममध्ये स्थान नाही, धक्का बसलेला वॉर्नर म्हणाला...

टीम इंडियाच्या मधल्या फळीतला आक्रमक बॅट्समन असणाऱ्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय कारकिर्द धडाक्यात सुरु झाली आहे. आपल्या पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये सूर्याने अर्धशतक केलं.

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै : टीम इंडियाच्या मधल्या फळीतला आक्रमक बॅट्समन असणाऱ्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय कारकिर्द धडाक्यात सुरु झाली आहे. आपल्या पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये सूर्याने अर्धशतक केलं. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) सारख्या भेदक बॉलरसमोर सुर्याने सिक्स मारून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली आपली पहिली रन काढली. आयपीएलच्या (IPL) मागच्या तीन मोसमांमध्ये सूर्यकुमार यादवने 400 पेक्षा जास्त रन केले आहेत. याच कामगिरीमुळे यादवची भारतीय टीममध्ये निवड झाली. सूर्यकुमार यादव सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडेमध्येही आपली छाप पाडण्यासाठी तयार आहे. या सीरिजआधी सूर्यकुमार यादव क्रिकबझसोबत बोलत होता. या संवादामध्ये सूर्यकुमारला आयपीएलमधली सर्वोत्तम खेळाडूंची टीम निवडायला सांगण्यात आलं. यानंतर त्याने रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जॉस बटलर, जसप्रीत बुमराह आणि राशिद खान यांची निवड केली, पण त्याने क्रिस गेल, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांना स्थान दिलं नाही. सूर्यकुमार यादवने टीममध्ये न घेतल्यामुळे हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मला टीमबाहेर ठेवलं यावर माझा विश्वासच बसत नाही, असं ट्वीट डेव्हिड वॉर्नरने केलं. श्रीलंका दौऱ्यावर गेलेला सूर्यकुमार यादव आता बॉलिंगचाही सराव करायला लागला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने 36 विकेट घेतल्या आहेत. सूर्यकुमार यादव हा मध्यम गती बॉलर आहे. शिखर धवनने संधी दिली तर सूर्यकुमार यादवची बॉलिंग श्रीलंका दौऱ्यावर बघायला मिळू शकते. सूर्यकुमार यादवची आयपीएल टीम जॉस बटलर, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या, आंद्रे रसेल, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी नियम : टीममध्ये स्वत:ची निवड करायची आणि मुंबईच्या जास्तीत जास्त 4 खेळाडूंना संधी
  Published by:Shreyas
  First published: