मुंबई, 01 फेब्रुवारी : सूर्यकुमार यादव टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध झाला आहे. मैदानावर उतरताच तो गोलंदाजांवर तुटून पडतो. सध्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो नंबर एकचा फलंदाज आहे. आयसीसीने बुधवारी एक फेब्रुवारीला टी२० रँकिंग जारी केलं आहे. यात त्याने आणखी एक विक्रम केला असून विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरमधील बेस्ट रँकिंग मिळवलं आहे. रेटिंग पॉइंटच्या बाबतीत तो आता डेव्हिड मलानने केलेल्या विक्रमाच्या थोडा मागे आहे. मलानने टी२० क्रिकेटमध्ये ९१५ रेटिंग पॉइंट मिळवले होते. तर सूर्यकुमारने ९१० रेटिंग पॉइंट मिळवले आहेत. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने पहिल्यांदाच ९०० चा आकडा पार केला आहे.
हेही वाचा : हनुमा विहारीचा डावखुरा अवतार, हात फ्रॅक्चर असूनही उतरला फलंदाजीला
सूर्यकुमारच्या आधी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये बेस्ट रँकिंग नंबर वन मिळवलं होतं. त्याचे रेटिंग पॉइंट ८९७ इतके होते. आता सूर्यकुमारने विराटला मागे केलं आहे. सूर्यकुमार जगातील केवळ तिसराच असा खेळाडू आहे ज्याने ९०० किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग पॉइंटस टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पटकावले आहेत. या यादीत सूर्यकुमार, मलान आणि तिसरा एरॉन फिंच हा आहे.
सध्या करिअरच्या बेस्ट रँकिंगमध्ये डेव्हिड मलान ९१५ अंकासह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव आहे. त्याचे ९१० रेटिंग पॉइंट असून एरॉन फिंचने ९०० रेटिंग पॉइंट्स मिळवले होते. विराट कोहलीने ८९७ पॉइंट मिळवले होते. तो चौथ्या स्थानावर असून पाचव्या क्रमांकावर बाबर आझम आहे. त्याने ८९६ पॉइंट मिळवले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Virat kohli