मुंबई, 18 नोव्हेंबर : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा आयपीएलनंतर देखील प्रकाशझोतात आहे. आयपीएलच्या या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने त्याचे नाव चर्चेत होते. त्याचबरोबर आता विराट कोहलीला ट्रॉल करणाऱ्या मिमला लाइक केल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
विराट कोहलीला पेपर कॅप्टन म्हणणाऱ्या या मिमला सूर्यकुमार यादव याने लाईक केले होते. त्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सूर्यकुमारला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. परंतु ट्रोलिंग व्हायला लागल्यानंतर त्याने ते ट्विट पुन्हा अनलाइक केलं होतं. विराट सध्या भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून घाम गाळत सराव करत आहे. नुकताच विराट कोहली याने आपल्या बॅटिंगचा एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला होता. यावर देखील सूर्यकुमार यादव याने कमेंट केली आहे.
वाचा-IPL मध्ये मिळालं टॉप ट्रेनिंग, आता भारताविरुद्ध खेळणार ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू
Energy 🔥 Sound 🔥 can’t wait to watch Domination 🔥#theBrand
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 17, 2020
या व्हिडिओ ट्विटसोबत विराटने लिहिलं आहे, टेस्ट प्रॅक्टिस सेशनवरचं माझं प्रेम. यावर या सूर्यकुमार यादव याने कमेंट करत ‘एनर्जी... साउंड... आणि तुझं वर्चस्व बघण्याची आतुरता’ असं म्हटलंय. सूर्यकुमार यादव याची ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यानंतर त्याच्यावर विराटाचे चाहते मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. सूर्यकुमारने आधी विराटवर टीका केली आणि ता प्रायश्चित्त म्हणून कौतुकाचं ट्विट करतोय असं एकाने ट्विटमध्ये म्हटलंय.
वाचा-धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये भारतीय संघ तीन वनडे, 3 टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेची सुरुवात वनडे सामन्यांनी होणार असून त्यानंतर टी-20 आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. वनडे सीरीज 27 नोव्हेंबर, टी-20 सीरीज 4 डिसेंबर आणि कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे.
वाचा-मॅकग्रा म्हणतो, विराटच्या अनुपस्थितीमध्ये या खेळाडूला सिद्ध करण्याची संधी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हा आहे संपूर्ण भारतीय संघ :
टी-20 टीम: विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी. नटराजन.
वनडे टीम: विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि संजू सॅमसन.
टेस्ट टीम: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि मोहम्मद सिराज.