हॅमिल्टन, 27 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. आज सकाळी नियोजित वेळेनुसार मॅच सुरु झाली. पण 4.5 ओव्हर्सनंतर पहिल्यांदा पावसानं अडथळा आणला. त्यानंतर दोन तासांनी खेळ पुन्हा सुरु झाला. पण यावेळी अम्पायर्सनी ओव्हर कमी करुन 29-29 चा खेळ होणार असल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतर 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला आणि दुसऱ्यांदा खेळ थांबला. त्यानंतर कमीत कमी ओव्हर्सचा खेळही होण्याची शक्यता नसल्यानं अम्पायर्सनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण यादरम्यान सूर्यकुमार यादवची मेहनत मात्र वाया गेली.
मैदानात सुकवण्यासाठी सूर्याचा हातभार
दरम्यान खेळ थांबला असताना मैदान सुकवण्यासाठी ग्राऊंड्समन चांगलीच मेहनत घेत होते. यावेळी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं मात्र त्यांना साथ दिली. मैदानात एका ग्राऊंड्समनला असिस्ट करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. पण सूर्याची ही मेहनत काही फळाला आली नाही. कारण त्यानंतर पाऊस आणि ओल्या आऊटफिल्डमुळे खेळच रद्द करण्यात आला.
The @seddonparknz ground staff gets some assistance from @surya_14kumar #NZvIND pic.twitter.com/0N856oLZfL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 27, 2022
सूर्याची दणक्यात सुरुवात
आज झालेल्या 12.5 ओव्हर्समध्ये टीम इंडियानं 1 बाद 89 धावा फटकावल्या होत्या. सलामीचा शिखर धवन लवकर बाद झाल्यानं सूर्यकुमारला वरच्या नंबरवर बढती मिळाली होती. सूर्यानं मैदानात उतरताच 25 बॉलमध्ये 35 धावा फटकावल्या होत्या. पण सूर्याच्या या इनिंगला पावसानं ब्रेक लावला.
here's a SKY six to help make this delay a bit more bearable Keep watching Prime Video for more updates from the 2nd #NZvIND ODI.#NZvINDonPrime #CricketOnPrime pic.twitter.com/HjMUifk9Tu
— prime video IN (@PrimeVideoIN) November 27, 2022
हेही वाचा - Cricket: ना पाऊस, ना बॅडलाईट... या अनोख्या कारणासाठी अम्पायर्सनी थांबवली मॅच, पाहा काय घडलं?
न्यूझीलंड दौऱ्यात पावसाचाच खेळ
टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेला हा दुसरा सामना ठरला. टी20 मालिकेत भारतानं एक सामना जिंकला होता. तर न्यूझीलंडनं ऑकलंडची पहिली टी20 जिंकली. त्याआधी तिसरी टी20 पावसामुळेच टाय झाली होती. पण पावसानं मात्र दोन सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. वेलिंग्टनमध्ये झालेली पहिली टी20 पावसामुळे वाया गेली होती. त्यानंतर आज हॅमिल्टनमध्ये पावसानंच बाजी मारली. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडनं एकेक सामना जिकला असला तरी पाऊस मात्र दोन सामने जिंकून सध्या आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sports, Team india