मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सूर्यकुमार यादवची गेल अन् सचिनच्या क्लबमध्ये एन्ट्री, IPLमध्ये घडवला इतिहास

सूर्यकुमार यादवची गेल अन् सचिनच्या क्लबमध्ये एन्ट्री, IPLमध्ये घडवला इतिहास

सूर्यकुमारने घडवला इतिहास

सूर्यकुमारने घडवला इतिहास

सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. संघाला विजय मिळवून देता आला नसला तर त्याने चाहत्यांची मने जिंकली.

मुंबई, 27 मे : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला हरवून फायनलमध्ये धडक मामरली. या सामन्यात गुजरातचा फलंदाज शुभमन गिलने जबरदस्त शतकी खेळी केली. यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मात्र मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. संघाला विजय मिळवून देता आला नसला तरी सूर्यकुमार यादवने मन जिंकलं. या खेळासह सूर्यकुमार यादवने आय़पीएलमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या हंगामात 43.21 च्या सरासरीने आणि 181.14 च्या स्ट्राइक रेटने 16 सामन्यात 605 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबंई इंडियन्सकडून एका हंगामात दोनच फलंदाजांना 600 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. याआधी सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये अशी कामगिरी केली होती.

IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच

सूर्यकुमार यादव आयपीएलच्या इतिहासातला असा भारतीय फलंदाज आहे ज्याने 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गेल्या 16 हंगामात कोणत्याही भारतीय फलंदाजाला असं करता आलेलं नाही. तर एकूण आयपीएल फलंदाजांमध्ये तो असा दुसरा फलंदाज आहे. याआधी ख्रिस गेलने 2011 मध्ये अशी कामगिरी केली होती.

गुजरात टायटन्सने दिलेलं २३४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबईच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबई इंडियन्सची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.  गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवून दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. 28 मे रोजी त्यांचा सामना चेन्नईविरुद्ध होणार आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2023