मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup 2022: सूर्यकुमारला करायची होती युवीच्या रेकॉर्डची बरोबरी? इंटरव्ह्यूमध्ये पाहा काय म्हणाला सूर्या…

Asia Cup 2022: सूर्यकुमारला करायची होती युवीच्या रेकॉर्डची बरोबरी? इंटरव्ह्यूमध्ये पाहा काय म्हणाला सूर्या…

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली

Asia Cup 2022: हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्सर लगावले. पण त्यावेळी खरंच युवराजच्या 6 सिक्सरच्या विक्रमाची बरोबरी करावी असं सूर्याच्या मनात आलं होतं का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

दुबई, 1 सप्टेंबर: सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या जोडीनं आशिया चषकात काल जोरदार बॅटिंग केली. हाँगकाँगविरुद्ध विराट आणि सूर्याच्या अभेद्य भागीदारीनं भारताला एक मोठा विजय मिळवून दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 2 बाद 192 धावांचा डोंगर उभारता आला. सूर्यकुमार आणि विराट या दोघांनीही नाबाद अर्धशतकं झळकावली. विराटनं 59 धावा केल्या पण सूर्याची खेळी विराटच्या तुलनेत काहीशी वरचढ ठरली.

शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा

भारताच्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरला सूर्यकुमार यादवनं तब्बल 26 धावा कुटल्या त्यात 4 सिक्सरचा समावेश होता. हारुन अर्शदच्या त्या ओव्हरमध्ये पहिले तीन बॉल सूर्यानं मैदानाबाहेर फटकावले. तेव्हा असं वाटलं होतं की हा आता युवराजच्या विक्रमाशी बरोबरी करेल. पण चौथ्या बॉलवर तो चुकला. पाचव्या बॉलवर त्यानं पुन्हा सिक्सर खेचली. आणि शेवटी दोन रन्स घेत त्या ओव्हरमध्ये एकूण 26 रन्स वसूल केले.

हेही वाचा - Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर बनला कॅप्टन, पाहा कुठे करणार फोर आणि सिक्सची बरसात?

 सामन्यानंतर विराटचा सवाल

या सामन्यानंतर विराट कोहलीनं सूर्यकुमारला अखेरच्या ओव्हरमधल्या त्या थराराविषयी सूर्याला प्रश्न विचारला. जेव्हा तीन सिक्स मारले तेव्हा युवीनंतर सहा सिक्स मारणारा दुसरा बॅट्समन व्हायचं ठरवलं होतंस का? असा सवाल विराटनं केला. तेव्हा सूर्यानं म्हटलं की ‘मी माझ्यापरीनं पूर्ण प्रयत्न केला. पण युवीला मागे टाकू शकलो नाही.’

बीसीसीआयनं हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर आज शेअर केला आहे.

First published:

Tags: Asia cup, BCCI, Sports, T20 cricket, Virat kohli