Home /News /sport /

IPL 2021: अर्जून तेंडुलकरच्या रुमवर अनोखा ‘छापा’, लॉकरमधील सामानाचा VIDEO होतोय VIRAL

IPL 2021: अर्जून तेंडुलकरच्या रुमवर अनोखा ‘छापा’, लॉकरमधील सामानाचा VIDEO होतोय VIRAL

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरच्या वाढदिवशीच त्याच्या रुमवर पडलेल्या अनोख्या (Surprise visit at the hotel room of Arjun Tendulkar on his birthday) छाप्याची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.

  नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरच्या वाढदिवशीच त्याच्या रुमवर पडलेल्या अनोख्या (Surprise visit at the hotel room of Arjun Tendulkar on his birthday) छाप्याची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. 24 सप्टेंबरला अर्जूनचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याला खास सरप्राईज देण्यासाठी मुंबई इंडियन्स टीममधील त्याचा सहकारी आदित्य तारेनं (Aditya Tare gives surprise visit to Arjun Tendulkar at his room) अर्जूनच्या रुममध्ये अचानक प्रवेश करत त्याला सरप्राईज दिलं. या अनोख्या छाप्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. अर्जूनच्या लॉकरमध्ये काय होतं? आदित्यच्या सरप्राईज व्हिजिटनंतर अर्जूनने आपल्या रुममधील लॉकर उघडून आत काय काय आहे, हे दाखवलं. याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. अर्जूनच्या रुममधील लॉकरमध्ये होते अंडे, मसालेदार ओट्स, भाज्या आणि मसाला शेंगदाणे.
  हे सगळं लॉकरमध्ये कशासाठी? खाण्याचे हे पदार्थ अर्जून लॉकरमध्ये का ठेवतो, असा प्रश्न अनेकांना पडेल. तर त्याचं कारण  आहे अर्जूनचे मित्र. आपले मित्र खाण्याचे हे सगळे पदार्थ फस्त करतात आणि आपल्याला खायला काहीच उरत नाही, असा अनुभव असल्यामुळेच आपण हे पदार्थ लॉकरमध्ये ठेवल्याचं अर्जूननं सांगितलं. हे वाचा - IPL 2021: CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण IPL डेब्युची प्रतीक्षा यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स टीमला अर्जूनला खरेदी केलं आहे. मात्र अद्याप तो मैदानात एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. फास्ट बॉलर असणाऱ्या अर्जूनला मैदानावर उतरलेलं पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. लवकरच तो मैदानात उतरेल आणि मुंबई इंडियन्सकडून खेळेल, या प्रतिक्षेत त्याचे चाहते आहेत.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Arjun Tendulkar, Birthday celebration, IPL 2021

  पुढील बातम्या