मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Mega Auction: 'पुन्हा पिवळ्या जर्सीत दिसणार रैना', रॉबिन उथप्पाने केला दावा

IPL 2022 Mega Auction: 'पुन्हा पिवळ्या जर्सीत दिसणार रैना', रॉबिन उथप्पाने केला दावा

Suresh Raina

Suresh Raina

: चेन्नई सुपर किग्जने(Chennai Super Kings) आयपीएलमध्ये (IPL 2022) 4 खेळाडुंना रेटेन केले आहे. पण आता लिलावात काही खास मॅचविनर खेळाडुंना परत आणण्यासाठी टीम कोट्यवधी रुपये खर्च करु शकते.

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: चेन्नई सुपर किग्जने(Chennai Super Kings) आयपीएलमध्ये (IPL 2022) 4 खेळाडुंना रेटेन केले आहे. त्यात धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. पण आता लिलावात काही खास मॅचविनर खेळाडुंना परत आणण्यासाठी चेन्नईची टीम कोट्यवधी रुपये खर्च करु शकते. अशी चर्चा रंगली असतानाच भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) स्टार खेळाडू सुरेश रैनावरुन (Suresh Raina) मोठे वक्तव्य केले आहे. पुन्हा पिवळ्या जर्सीत रैना दिसणार असल्याचा दावा उथप्पाने केला आहे.

आयपीएल फ्रँचायझींना जास्तीत जास्त 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती, त्यामुळे सुरेश रैना व्यतिरिक्त 'मॅच विनर' फाफ डू प्लेसिसला देखील रिलीज करण्यास भाग पाडले गेले.

दरम्यान, रॉबिन उथप्पाने पुन्हा पिवळ्या जर्सीत रैना दिसणार असल्याचा दावा केला आहे. आयपीएल 2022 मेगा लिलावात(IPL 2022 Mega Auction) सुरेश रैना हा पहिला खेळाडू आहे. ज्याला कायम ठेवणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम सीएसके रैनाला खरेदी करेल. अशी आशा उथप्पाने यावेळी व्यक्त केली.

'सीएसके आधी रैनाला खरेदी करेल'

तसेच, रैना 'यलो आर्मी'चा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याने गेल्या 10-12 वर्षांत सीएसकेला बाद फेरीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो संघाचा खास खेळाडू आहे, त्यामुळे मला वाटते की तो पहिला व्यक्ती असेल ज्याला CSK खरेदी करेल. असे मत रॉबिन उथप्पाने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त केले.

तसेच, ' फाफ डू प्लेसिसला सोडणे हा संघासाठी एक अवघड निर्णय असावा, परंतु मला वाटते की संघाने मोईन अलीचे अनुसरण केले. कारण तो दुहेरी भूमिका बजावू शकतो. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखलं जातं चेन्नईसाठी खेळताना रैनाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सुरेश रैना धोनीचा फेवरेट खेळाडू आहे. चेन्नईची नजर रैनावर नक्कीच राहणार आहे. रैनाचा मागील सीझन काही खास गेला नव्हता. तो जास्त खेळताना दिसून आला नव्हता.

IPL मेगा लिलाव कधी होणार?

आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या मेगा लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु अशी अपेक्षा आहे की हा मोठा कार्यक्रम डिसेंबर 2021 किंवा जानेवारी 2022 मध्ये आयोजित केला जाऊ शकतो. सीएसके किती जुन्या खेळाडूंना संघात परत आणते हे पाहावे लागेल.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Ipl 2022 auction, Suresh raina