ऑपरेशनंतर सुरेश रैना झाला भावनिक, शेअर केला 'हा' VIDEO

ऑपरेशनंतर सुरेश रैना झाला भावनिक, शेअर केला 'हा' VIDEO

नुकतेच सुरेश रैनाच्या गुडघ्याचे ऑपरेशन पार पडले, त्यामुळं तो सहा आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : भारतीय संघात गेली अनेक वर्ष स्थान न मिळालेला पण आयपीएल गाजवणारा फलंदाज म्हणजे सुरेश रैना. एकेकाळी आपल्या क्षेत्ररक्षणासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र सध्या सुरेश रैना गुडघ्य़ाच्य त्रासांनी ग्रासला आहे. दरम्यान रैनानं दुसऱ्यांदा गुडघ्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे कठिण असल्याचेही मत सोशल मीडियावर त्यानं व्यक्त केलं होतं.

काही दिवसांपूर्वी रैनानं आपल्या गुडघ्याचे ऑपरेशन केले. या दुखापतीमुळं गेल्या वर्षभरात त्याला फारसे क्रिकेट खेळता आले नाही, दरम्यान आता या त्रासातून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 6 आठवडे रैनाला क्रिकेटपासून लांब रहावे लागणार आहे. दरम्यान आता सुरेश रैनानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. यात ट्रेड मिलवर तो सपोर्टचा वापर करत चालत आहे.

रैनानं हा व्हिडिओ शेअर करत, “ही माझ्यासाठी खुप कठिण गोष्ट आहे. मात्र तुम्ही हिम्मतीनं परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. सध्या कठिण काळ आहे. डोकं आणि शरीर बदल्यानंतर काम करणं कठिण असतं, पण स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे.

वाचा-मोदी सरकारचं नाही ऐकणं टीम इंडियाच्या मॅनेजरला पडणार भारी, मिळणार शिक्षा!

रैनानं झाला भावूक

रैनानं सोशल मीडियावर, “दुसऱ्यांदा गुडघ्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय कठिण होता. कारण यामुळं मी काही महिने क्रिकेटपासून लांब राहणार आहे. काही आठवडेआधीपर्यंत मी यासाठी तयार नव्हतो, पण यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. त्यामुळं मी तयार झालो”. दरम्यान रैनानं मला आशा आहे की, लवकरच मी स्वत:च्या पायावर उभा राहेन आणि मैदानावर उतरेन”,असेही सांगितले.

वाचा-रक्षाबंधनआधीच बुमराहनं बहिणीला दिलं अनोखं सरप्राईज

2007मध्ये झाले होते पहिले ऑपरेशन

भारताकडून 18 कसोटी, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 सामने खेळलेल्या रैनानं शेवटचा सामना 2018मध्ये खेळला होता. दरम्यान 2007मध्ये पहिल्यांदा रैनाला गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले होते. यातून तो बाहेर पडला मात्र, पुन्हा त्याला हा त्रास सुरु झाला आहे.

वाचा-जवानापेक्षा कमी नाही धोनीचा जोश! गंभीर दुखापतीतही सीमेवर करतोय देशाचे संरक्षण

VIDEO : सांगलीच्या महापुरात भिडे गुरुजींना आठवला लवासा, मदतीचं काय?

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2019, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading