भारतात परतल्यानंतर सुरैश रैनानं दिली प्रतिक्रिया, 'त्या' प्रकरणाचा छडा लावण्याची पोलिसांना केली विनंती

भारतात परतल्यानंतर सुरैश रैनानं दिली प्रतिक्रिया, 'त्या' प्रकरणाचा छडा लावण्याची पोलिसांना केली विनंती

रैना परत आल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. अखेर रैनानं याबाबत मौन सोडले आहे. रैनाने ट्वीट कर पंजाब पोलिसांना अपील केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा खेळाडू सुरेश रैनानं (Suresh Raina) आयपीएल सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैना परत आल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. अखेर रैनानं याबाबत मौन सोडले आहे. रैनाने ट्वीट कर पंजाब पोलिसांना अपील केले आहे.

रैनानं ट्वीट करत, "माझ्या कुटुंबासोबत जे घडलं ते भयावह होतं. माध्या काकांचा मृत्यू झाला. माझी आत्या आणि चुलत भावाला सुद्ध गंभीर दुखापत झाली. दुर्दैवाने माझ्या चुलत भावाचा मृत्यू झाला. तर, आत्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. त्या रात्री काय घडले हे आम्हाला आतापर्यंत माहित नव्हते असे रैनाने सांगितले.

वाचा-धोनीसोबत झालेल्या वादामुळे सुरैश रैना IPL सोडून भारतात परतला?

रैनानं यावेळी मी पंजाब पोलिसांना या प्रकरणात लक्ष देण्याचे आवाहन करतो. त्याच्याबरोबर हे कोणी केले हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे.

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला

पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. हे कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. यानंतर रैनानं आयपीएल सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

वाचा-सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

रैनावर संघमालकांनी केले होते आरोप

चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश रैनाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. एन श्रीनिवासन यांनी आरोप केला आहे की, कौटुंबिक कारणामुळे नाही तर आपल्या मनाप्रमाणे हॉटेल रूम न मिळाल्यामुळे रैनानं आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. दुबईतील सुरेश रैनाच्या हॉटेल रूममध्ये बाल्कनी नव्हती. धोनीच्या खोलीत बाल्कनी होती. सुरेश रैनाला त्याच्या परिवारासाठी धोनीसारखी रूम हवी होती, पण जेव्हा तसे झाले नाही तेव्हा त्याने रागाने टीम सोडली आणि दुबईहून दिल्लीला परतला, असे सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: September 1, 2020, 12:38 PM IST

ताज्या बातम्या