मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /म्हणून IPL सोडून भारतात परतलो, सुरेश रैनाचा खुलासा

म्हणून IPL सोडून भारतात परतलो, सुरेश रैनाचा खुलासा

क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएल (IPL 2020) च्या 13व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कडून खेळण्यासाठी युएईला गेला होता, मात्र टीममधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं तो अचानक सामने सुरू होण्यापूर्वीच भारतात निघून आला होता.

पुढे वाचा ...

    मुंबई, 2 जानेवारी : क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएल (IPL 2020) च्या 13व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कडून खेळण्यासाठी युएईला गेला होता, मात्र टीममधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं तो अचानक सामने सुरू होण्यापूर्वीच भारतात निघून आला होता. त्याच्या या निर्णयानं खळबळ माजली होती, तसंच अनेक तर्कवितर्क लढवले गेले. आयपीएल अर्धवट सोडल्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. त्याला हॉटेलमधील स्पेशल रूम हवी होती; पण ती मिळाली नाही. त्यामुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचंही म्हटलं गेलं.

    एन. श्रीनिवासन यांनीही रैनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत स्फोटक विधान केलं होतं, तरीही त्या वेळी रैनानं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. रैनानं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महेंद्रसिंग धोनी बरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल सामन्यांसाठी रवाना झाला होता. रैनानं चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल सामन्यांमध्ये 33.28 या सरासरीने 4 हजार 527 धावा केल्या आहेत.

    नुकतचं त्यानं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं. त्या काळात त्याच्या कुटुंबात एक भयंकर दुर्दैवी घटना घडली होती, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती. पठाणकोटमध्ये एका दरोड्यात त्याच्या काका, काकूची हत्या करण्यात आली होती. तसंच कोरोना साथीच्या काळात आपल्या पत्नीलाही आपली गरज होती, त्यामुळं आपण परत येण्याचा निर्णय घेतल्याचं रैनानं सांगितलं. या निर्णयाचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. हा वेळ मी कुटुंबासोबत घालवला. गेली 20 वर्षे मी खेळत आहे. मी पुन्हा खेळेनच पण जेव्हा तुमच्या कुटुंबाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर असणं आवश्यक असतं. माझा हा निर्णय योग्य होता असं वाटतं, असंही रैनानं सांगितलं.

    रैनानं पुन्हा खेळण्याची तयारी दर्शवली असली तरी आता पुन्हा चेन्नईच्या टीममध्ये त्याला समाविष्ट करण्यात येईल का, याबाबत टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं रैनाच्या टीममधील समावेशाबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे.

    First published:
    top videos