रैनासुद्धा! धोनीच्या खास विश्वासू खेळाडूनेही माहीपाठोपाठ घेतला क्रिकेट संन्यास

रैनासुद्धा! धोनीच्या खास विश्वासू खेळाडूनेही माहीपाठोपाठ घेतला क्रिकेट संन्यास

कॅप्टनकूल महेंद्रसिंहने धोनीने (MS Dhoni retirement news) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास जाहीर केल्यानंतर काहीच मिनिटात त्याचा खंदा साथीदारानेसुद्धा (Suresh raina) संन्यास जाहीर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट :   आणि विश्वासू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानेसुद्धा निवृत्ती जाहीर केली आहे. Instagram पोस्टमधून रैनाने मीसुद्धा तुझ्या प्रवासात तुला साथ द्यायचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत रैनाने क्रिकेटला अलविदा केला आहे.

मधल्या फळीतला भरवशाचा फलंदात आणि संघाच्या गरजेनुसार ऑफस्पिन बॉलिंग करून यश मिळवणारा रैना एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.

कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे.

सुरेश रैना यानेसुद्धा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला काही काळ गाजवला होता.

सर्वात मोठी बातमी! कॅप्टन कूलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या काही खेळी लक्षात राहणाऱ्या आहेत. वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात त्याचं स्थान लक्षात राहण्यासारखं होतं. त्याने त्या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

आता धोनीबरोबरच रैनानेसुद्धा क्रिकेट संन्यास जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना आणखी हुरहूर लागली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 15, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या