मुंबई, 2 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नईच्या (CSK) टीमचा महत्त्वाचा भाग असलेला सुरेश रैना (Suresh Raina) मागच्यावर्षी आयपीएल (IPL 2020) अर्ध्यातून सोडून युएईतून भारतात परतला होता. रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. चेन्नईच्या टीमचे मालक एन.श्रीनिवासन यांनी रैनावर नाराज झाले होते. रैनाला हॉटेलमध्ये धोनी (MS Dhoni) सारखी रूम न मिळाल्यामुळे तो नाराज झाल्याचं श्रीनिवासन यांनी सांगितलं होतं. सुरेश रैनाचे आयपीएलदरम्यान धोनीसोबतही वाद झाले होते, असं बोललं गेलं.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार धोनीने रैनासोबत चर्चा केली आणि त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण तरीही रैना ऐकला नाही. धोनी आणि रैना यांची मैत्री सर्वश्रुत आहे. ज्यादिवशी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याच दिवशी काही मिनिटांच्या आतच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलं.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रैनाने धोनीसोबतच्या मैत्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी आणि धोनीची मैत्री वेगळ्या प्रकारची आहे. आम्ही भारत आणि चेन्नईसाठी बऱ्याच मॅच जिंकल्या. मी आणि धोनी लवकरच भेटू. आमची पार्टनरशीप पुन्हा सुरू होईल. गोष्टी योग्य होतील आणि मला अपेक्षा आहे की सगळं काही योजनेनुसार होईल,' असं रैना म्हणाला.
म्हणून IPL सोडून भारतात परतलो, सुरेश रैनाचा खुलासा
15 ऑगस्ट 2020 साली 7 वाजून 29 मिनिटांनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर काही मिनिटांमध्येच रैनानेही आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडत असल्याचं जाहीर केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.