धोनीला मोठा झटका, आम्रपाली प्रकरणात कोर्टानं दिले 'हे' आदेश

धोनीला मोठा झटका, आम्रपाली प्रकरणात कोर्टानं दिले 'हे' आदेश

सर्वोच्च न्यायालयानं एका महिन्यांच्या आत 6.50 कोटी परत करण्याचे आदेश धोनीला दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ब्रँडअँबेसडर असलेल्या आम्रपाली समुहाला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या कंपनीवर तब्बल 46 हजार खरेदीदारांना वेळेवर घर न दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार 6 कोटी 52 लाख रुपये रिती स्पोर्ट्स प्रा.लि. कंपनीत बेकायदेशीरपणे वळवले. दरम्यान, या कंपनीचे सर्वात जास्त शेअरर्स हे धोनीच्या नावावर आहेत.

आम्रपाली समुहानं रिती स्पोर्ट्स कंपनीत पैसे गुंतवण्याआधी एक करार केला होता. यात ही कंपनी धोनीला तीन दिवसांसाठी आम्रपाली कंपनीच्या कार्यक्रमासाठी तयार करेल. दरम्यान त्यानंतर या समुहानं धोनीला आपल्या कंपनीचे ब्रँडअँबेसडर केले.

'एका महिन्यात पैसे परत करा'

सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या रिपोर्टनुसार 2009 ते 2015मध्ये 6.50 कोटी रुपये साक्षी संचालिका असलेल्या संस्थेला देण्यात आले होते. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयानं एका महिन्यांच्या आत सर्व संबंधित कंपन्यांना पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ईडीकडून या कंपन्यांची चौकशीही केली जाऊ शकते. त्यामुळं धोनीच्या अडचणी वाढणार आहेत.

वाचा- काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

धोनीनं केला होता पैसे थकवल्याचा आरोप

धोनीनं काही महिन्यांपूर्वी या ग्रुप विरोधात न्यायालयात फसवणुकीची तक्रार केली आहे. धोनी ब्रँडअँबेसडर असताना, या समुहासाठी केलेल्या प्रमोशनचे पैसे न दिल्याचा आरोप या केला आहे.या कंपनीनं धोनीचे 40 कोटी रुपये थकवले आहेत. 2009मध्ये धोनीनं आम्रपाली समूहासाठी प्रमोशन करण्यात सुरुवात केली. मात्र, 2016 मध्ये आम्रपाली कंपनीवर फसवणुकीचे आरोप केले जाऊ लागले तेव्हा धोनी स्वतः या ग्रुपपासून वेगळा झाला.

वाचा- कॅप्टन कोहलीमुळं रवी शास्त्री पॉवरफुल, प्रशिक्षक पदी राहणार कायम?

46 हजार खरेदीदारांनी फसवणारी आहे ही कंपनी

आम्रपाली कंपनीवर आरोप आहेत की त्यांनी 46 हजार खरेदीदारांना वेळेवर घर दिले नाही. त्यामुळं न्यायालयानं कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आम्रपाली ग्रुपवर 38.65 कोटी रुपये आणि त्यावर व्य़ाज 16.25 कोटी रुपयांची थकीत आहे. धोनीनं आपल्या याचिकेत या पैशांची मागणी केली आहे.

वाचा-निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार युवराज सिंग, येथे पाहू शकता सामना

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Jul 25, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या