स्मिथ-वॉर्नरसाठी IPL चे दोन संघ भिडले, सोशल मीडियावर 'लढाई'

स्मिथ-वॉर्नरसाठी IPL चे दोन संघ भिडले, सोशल मीडियावर 'लढाई'

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघेही सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्यावरून आयपीएलमधील दोन्ही संघ आमने सामने आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : चेंडूशी छेडछाड केल्याबद्दल दोन वर्षांची बंदीचा काळ पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी जबरदस्त पुनरागमन केलं. वॉर्नर वर्ल्ड कपमध्ये तुफान फ़ॉर्ममध्ये दिसला तर स्टीव्ह स्मिथने अॅशेस मालिकेत एकापाठोपाठ एक विक्रम रचले. लंकेविरुद्धच्या मालिकेतही दोघांनी धावांचा पाऊस पाडला. वॉर्नरने एकदाही बाद न होता तीन सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतके केली.

स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने लंकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर शेवटच्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. दोघांच्या या जबरदस्त कामगिरीनंतर आयपीएलमधील वॉर्नर आणि स्मिथ खेळत असलेले संघ सोशल मीडियावर भिडले आहेत.

राजस्थान रॉयल्सने सुरुवातील अरॉन फिंचसोबत स्टीव्ह स्मिथचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर म्हटलं होतं की, डेव्हीड वॉर्नरला सांगा, मला आज फलंदाजीची गरज आहे. यावर सनरायझर्स हैदराबादने उत्तर देताना म्हटलं की, जर दोघेही सोबत फलंदाजी करतील तर त्यापेक्षा उत्तम काय असेल?

सनरायझर्सच्या उत्तरानंतर राजस्थानने पुन्हा प्रश्न विचारला की, तुम्ही वॉर्नरला मोकळं करणार आहात काय?

स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर हे आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळतात त्यांच्यासाठी स्टार खेळाडू आहेत. स्मिथच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. तर डेव्हिड वॉर्नरसुद्धा सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने आयपीएलसुद्धा जिंकले आहे.

गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

पाकच्या गोलंदाजावर भारतीय संस्कार! फलंदाजाला बाद करताच करतो 'हे' काम, पाहा VIDEO

सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Nov 2, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading