Home /News /sport /

गुजरातला 'बिर्याणी' चारत हैदराबादची प्ले आॅफमध्ये धडक

गुजरातला 'बिर्याणी' चारत हैदराबादची प्ले आॅफमध्ये धडक

सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सला 'बिर्याणी' चारत प्ले आॅफमध्ये जागा मिळवलीये. हैदराबादने गुजरातवर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला.

13 मे : सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सला 'बिर्याणी' चारत प्ले आॅफमध्ये जागा मिळवलीये. हैदराबादने गुजरातवर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. गुजरातने टाॅस जिंकून पहिली बॅटिंग करत हैदराबादसमोर 155 धावांचं टार्गेट दिलं. पण हैदराबादची सुरुवात खऱाब राहिली. प्रवीण कुमारने शिखर धवन आणि ओनरीकेजला स्वस्तात आऊट केलं. पण त्यानंतर आलेल्या डेव्हिड वाॅर्नर आणि विजय शंकरने टीमची कमान मजबूत सांभाळली. डेव्हिड वाॅर्नरने सर्वाधिक 69 आणि विजय शंकरने नाबाद 63 रन्सची खेळी करत विजयाचा पार भरला. 15.1 ओव्हरमध्ये 133 रन्सची भागिदारी करत टीमला विजय मिळवून दिला. वाॅर्नरने 52 बाॅल्समध्ये 9 चौकार तर विजयने 44 बाॅल्समध्ये 9 चौकार लगावले. गुजरात लायन्सकडून ईशान किशन 61 रन्स तर ड्वेन स्मिथने 54 सर्वाधिक रन्स केले. पण, एकापाठोपाठ एक गडी बाद झाल्यामुळे अवघी टीम 154 रन्सवर ढेर झाली. या विजयासह सनराईजर्स हैदराबादने प्ले आॅफमध्ये पोहचली आहे.
First published:

Tags: Sunrisers hyderabad

पुढील बातम्या