IPL2018 : 'हैदराबादी नवाबां'ची यंदा जेतेपदावर नजर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:45 PM IST

IPL2018 : 'हैदराबादी नवाबां'ची यंदा जेतेपदावर नजर

 आयपीएलच्या 'रन'संग्राम सुरू होणार आहे आणि सनराइजर्स सहाव्यांदा मैदानात उतरली आहे. यावेळी या 2016 मध्ये सनराइजर्स हैदराबादला पहिला किताब पटकावून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नर 'बॉल टेम्परिंग प्रकरणात सापडल्यामुळे बाहेर काढण्यात आलंय. तरीही ही टीम विजेतापदासाठी दावा ठोकू शकते.

 सन टीव्ही नेटवर्कच्या मालिकाच्या या फ्रेंचाईजीने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पाऊल टाकले. सनराइजर्स हैदराबादने 2013 आणि 2017 मध्ये प्लेआॅफ मध्ये जागा बनवली होती. 2014 आणि 2015 मध्ये ही टीम लीग स्टेजच्या पुढे जाऊ शकली नाही. तर 2016 मध्ये या टीमने चॅम्पियन होईन सगळ्यांना धक्का दिला. या टीमने आतापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळले आहे, यात 41 विजय आणि 34 सामन्यात पराभव झालाय. या टीमचा जिंकण्याचा सरासरी हा 54.60 टक्के इतका राहिलाय.

 आयपीएल 2018 मध्ये सनराइजर्सने डेव्हीड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमारला अनुक्रमे 12 आणि 8.5 कोटींमध्ये खरेदी केलंय. तर राशिद खानला 9 कोटी, शिखर धवन 5.2 कोटी, दीपक हुड्डा 3.6 कोटीमध्ये राइट टू मैच कार्डद्वारे खरेदी केलंय. तर मनीष पांडेला 11 कोटींमध्ये बोली लावून खरेदी केलंय. तो वॉर्नरला टीममधून हटवल्यानंतर सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.

 आॅस्ट्रेलियाचे दिग्गज आॅलराउंडर टॉम मूडी या टीमचे मुख्य कोच आहे. तर साइमन हेलमोट हे उप कोच आहे. श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरन या टीमचे बॉलिंग कोच आहे. तर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण टीमचे मार्गदर्शक आहे. हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होमग्राउंड आहे.

  सनराइजर्स टीम व्यवस्थापकाने यावेली बॉल टेंपरिंग वादात अडकलेल्या डेव्हिड वॉर्नरची हकालपट्टी केलीय आणि त्याच्या जागी न्यूझिलंडच्या केन विलियमसनला कर्णधारपदी नियुक्त केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...