चुरशीच्या सामन्यात हैदराबादचा आरसीबीवर विजय

चुरशीच्या सामन्यात हैदराबादचा आरसीबीवर विजय

  • Share this:

07 मे : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सने राॅयल चॅलेंजर्सला पाच धावांनी पराभूत केलं.

आरसीबीने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने पहिली बॅटिंग करत निर्धारीत 20 षटकात 146 धावा केल्यात. हैदराबादची सुरुवात खराब राहिली. ओपनिंग जोडी  शिखर धवन 13 तर अलेक्स हॅलेस 5 धावा करून झटपट बाद झाले. त्यानंतर केन विल्मसनने 56 धावांची शानदार खेळी करून टीमचा डाव सावरला. पण त्याला शकीब हसन 35 धावा करून चांगली साथ दिली. इतर खेळाडूंचा आरसीबीच्या फलंदाजासमोर टिकाव लागू शकला नाही.

147 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची चांगलीच दमछाक झाली. मानस व्होरा 8, पटेल 20 धावा करून झटपट बाद झाले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावा केल्यात. तर कोलीन ग्रँडहोमे आणि मंदीप सिंगने कडवी झुंज दिली. अखेरच्या ओव्हरमध्ये 1 चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. पण षटकार हुकला आणि आरसीबीचा पराभव झाला.

First published: May 7, 2018, 11:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading