Home /News /sport /

मुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव

मुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव

24 एप्रिल : हैदराबाद सनरायझर्सने दिलेल्या 119 धावांचं माफक आव्हान पार करताना मुंबई इंडियन्सचा पार धुव्वा उडाला. अवघा संघ 87 धावावरच गारद झाला. आयपीएलच्या 11 व्या हंगामातला हा मुंबई इंडियन्सचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाॅलरनी आपली चोख भूमिका बजावत हैदराबादच्या संघाला 18.4 षटकातच 118 धावांवर रोखलं. हैदराबादकडून केन विलियमसन आणि युसूफ पठानने सर्वाधिक 29-29 धावा केल्यात. 119 धावांचं माफक आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स मैदानात उतरली. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबई इंडियन्सचा संघाला सुरूंग लावला. सुर्यकांत यादव 34 तर क्रृणाल पांड्या 24 धावा करू शकले. या दोघांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा ही गाठता आला नाही. 18.5 षटकार मुंबईचा संघ 87 धावांवर गारद झाला. हैदराबादने मुंबईला पुन्हा आपल्याच होमग्राऊंडवर धूळ चारत शानदार विजय मिळवला.
First published:

Tags: #MI, Ipl 2018, Mumbai Indians, Sunrisers hyderabad

पुढील बातम्या