26 एप्रिल : हैदराबाद सनरायझर्सच्या गोलदाजांनी कमाल दाखवत बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाबला चांगलीच धूर चाळली. पंजाबच्या संघाला 119 धावांवर रोखत हैदराबादने 13 धावांनी शानदार विजय मिळवला.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने आणखी एक विजयाची नोंद केली. पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पंबाज संघाच्या गोलंदाजांनी २० षटकांत १३२ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पंजाबकडून मनिष पांडेंनी सर्वाधिक 54 धावा केल्या.
133 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला माफक आव्हानं वाटलं. पण हैदराबादच्या गोलदाजांनी पंजाबच्या फलंदाजांचा पळताभुई करून सोडला. पंजाबचा अवघा संघ 19.2 षटकात 113 धावांवर गारद झाला. पंजाबकडून लोकेश राहुलने सर्वाधिक 32 धावा केल्यात. तर ख्रिस गेल 23 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कोणत्याही खेळाडूचा निभाव लागू शकला नाही. हैदराबादकडून रशीद खानने 3 तर संदीप शर्मा, बशील, शाकीब हसनने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.