Home /News /sport /

ध'वन' खेळीच्या बळावर हैदराबादचा 'राॅयल' विजय

ध'वन' खेळीच्या बळावर हैदराबादचा 'राॅयल' विजय

राजस्थान राॅयलने दिलेलं 126 धावांचं माफक आव्हान सनरायजर्स हैदराबादने सहज पार करत विजयी सलामी दिलीये.

09 एप्रिल : राजस्थान राॅयलने दिलेलं 126 धावांचं माफक आव्हान सनरायजर्स हैदराबादने सहज पार करत विजयी सलामी दिलीये. शिखर धवनच्या 77 धावांच्या आक्रमक खेळीच्या बळावर हैदराबादने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या अकराव्या हंगामात आज हैदराबाद आणि राजस्थान हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडले. सामन्याच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  हैदराबादच्या गोलंदाजांनी आपला निर्णय सार्थ ठरवत राजस्थान राॅयलला सुरुंग लावला. पहिल्याच ओव्हरमध्ये शाॅर्टला बाद करून राॅयलला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे 13 धावा करून बाद झाला. बेन स्ट्रोक टीमची कमान सांभाळण्यासाठी आला पण अवघ्या 5 धावा करून तोही माघारी परतला. संजू समसाॅनने एकाकी झुंज देत 49 धावा कुटल्यात. निर्धारित 20 षटकांमध्ये अवघा संघ 125 धावांवर 9 गडी बाद  गारद झाला. 126 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबाद टीमला दुसऱ्याच षटकार रिद्धमान साहा 5 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर शिखर धवन आणि केन विल्यम्सनने टीमची कमान सांभाळत विजयाचा पाया भरला. शिखर धवनने 57 चेंडुत 13 चौकार एक षटकार लगावत नाबाद 77 धावा कुटल्यात. तर केन विल्यम्सनने 35 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 36 धावा करून शिखर साथ दिली. हैदराबाद टीमने अवघ्या 15.5 षटकार 127 धावा करत विजयी सलामी दिली.
First published:

Tags: IPL2018, Rajasthan Royals, Sunrisers hyderabad, राजस्थान राॅयल, सनरायजर्स हैदराबाद

पुढील बातम्या