सचिन-द्रविडला जमलं नाही ते विराट करणार का? गावस्करांचा 'हा' विक्रम अबाधितच

भारताचा कर्णधार विराट कोहलीने विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतकं केली असली तरी गावस्करांचा कसोटीतील विक्रम मोडण्याचं अशक्यप्राय आव्हान त्याच्यासमोर आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 03:06 PM IST

सचिन-द्रविडला जमलं नाही ते विराट करणार का? गावस्करांचा 'हा' विक्रम अबाधितच

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रमही मागे टाकण्याची संधी विराटला आहे. दरम्यान, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा एक विक्रम मात्र आजपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही.

सुनील गावस्कर यांनी विंडीजविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक 13 शतकं केली आहेत. विंडीजच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांची ही शतकं एक विक्रम आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये झालेल्या मालिकेत सुनील गावस्कर वगळता कोणत्याही फलंदाजानं 7 पेक्षा जास्त शतकं केलेली नाहीत.

शतकांचं शतक करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनलासुद्धा विंडीजविरुद्ध फक्त 3 शतकं करता आली आहेत. विंडीजचे महान फलंदाज क्लाइव लॉइड यांनीही फक्त 7 शतकं केली आहेत. गावस्कर यांच्यानंतर क्लाइव्ह लॉइड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शिवनारायण चंद्रपॉलनेसुद्धा 7 शतकं केली आहेत.

भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आणि द वॉल म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडने विंडीजविरुद्ध 23 कसोटीत 5 शतकं केली आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणने 4 शतकं केली आहेत. विराटने वनडेत विंडीजविरुद्ध 7 शतकं झळकावली असली तरी कसोटीत मात्र त्याला फक्त 2 शतकंच करता आली आहेत.

भारत आणि विंडीज यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात आतपर्यंत गावस्कर यांची सरासरी सर्वाधिक आहे. 20 पेक्षा जास्त सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये गावस्कर सरासरीमध्ये वरच्या स्थानावर आहेत. त्यांनी 27 कसोटीत 65.45 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यांच्यानंतर शिवनारायन चंद्रपॉल याने 63.85 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Loading...

ईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...