Home /News /sport /

सुनील गावसकरांच्या 'त्या; वक्तव्यावर अनुष्का संतापली; म्हणाली....

सुनील गावसकरांच्या 'त्या; वक्तव्यावर अनुष्का संतापली; म्हणाली....

गावसकर यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद सुरू आहे

    मुंबई, 25 सप्टेंबर :गुरुवारी रात्री आयपीएल (IPL 2020) सामन्यात कॉमेंट्रीदरम्यान सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या खासगी आयुष्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, गावसकर यांच्यासारख्या महान फलंदाजाने अशा प्रकारे वक्तव्य करणं अपेक्षित नाहीत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान गावसकर यांनी विराट आणि अनुष्कावर टिप्पणी केली. आता सुनील गावसकर यांच्या वक्तव्यावर विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर यावर सविस्तर प्रतिक्रिया लिहिली आहे. कालच्या सामन्यात विराटची कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काने गावसकर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करीत अनुष्काने म्हटलं आहे की, “खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”.पुढे तिने म्हटलं आहे की, “मला खात्री आहे की माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करताना तुमच्याकडे इतर पर्यायी शब्द किंवा वाक्य उपलब्ध असतील. की त्यात माझं नाव जोडताना ते मर्यादित राहतात”. विराट ठरला अपयशी आरसीबीचा कर्णधार विराट हा किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधातील सामन्यात अपयशी राहिला. क्षेत्ररक्षण करीत असताना त्याने लोकेश राहुलच्या दोन कॅच सोडल्या. राहुल याने 132 धावा काढल्या. त्यानंतर टीमदेखील राहुल इतक्या धावा करू शकली नाही. विराटची बॅटिंग आणि कर्णधारपदावरही सवाल उपस्थित करण्यात आला. त्यांनी जोश फिलीपसारख्या तरुण फलंदाजाला त्याच्याआधी फलंदाजी करण्यास पाठविले. फिलीप काही खास करू शकला नाही. यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलेल्या कोहलीने पाच बॉलवर केवळ एकच धाव काढली. विराटने चाहत्यांना केलं नाराज गावसकर यांच्या वक्तव्यानंतर विराट कोहरीचे चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर ते विविध पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करीत आहेत. काही चाहत्यांनी बीसीसीआयकडे गावसकर यांना कॉमेंट्री पॅनलवर हटविण्याची मागणी केली आहे. गावसकरांनी केलेलं वक्तव्य येथे नमूद  शकत नाही. हे ही वाचा-IPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर एक चाहता म्हणाला - गावसकर यांच्या सारख्या महान खेळाडूने कॉमेंट्रीदरम्यान अनुष्का आणि विराट यांच्या खासगी जीवनावर टिप्पणी करणे अत्यंत चुकीचे आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने सांगितले की, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. प्रत्येक खेळाडूच्या जीवनात चांगले -वाईट प्रसंग येतात. विराटसाठी गुरुवारचा सामना चांगला राहिला नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anushka sharma, Virat kohali

    पुढील बातम्या