News18 Lokmat

IPL 2019 : असं काय झालं की, खुद्द लिटल मास्टर गावस्कर झाले ट्रोल

मैदानावर जेवढं आयपीएल गाजतं तेवढचं ते पडद्यामागही गाजतं. यातूनच झाले गावस्कर ट्रोल

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 06:18 PM IST

IPL 2019 : असं काय झालं की, खुद्द लिटल मास्टर गावस्कर झाले ट्रोल

नवी दिल्ली, 27 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामाला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झाले असताना लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चार दिवसांत फलंदाजांची तुफान फटकेबाजी काही अप्रतिम झेल आणि वाद असं मिश्रण पहिल्या चार दिवसांतच पाहायला मिळालं. पण या सगळ्याबरोबरच पडद्यामागच्या घडामोडीही दिवसेंदिवस रंगत होत चालल्या आहेत. कारण खेळाडूंबरोबर IPLचे कॉमेंटेटरही तेवढीच मजा करतात.

नुकतेच इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन यानं भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना ट्रोल केले. तर, झालं असं की, मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फिरोज शाह कोटलावर झालेल्या सामन्यात एक अनोखा प्रसंग घडला.या प्रसंगामुळं पीटरसननं गावस्करांना ट्रोल केलं. आयपीएलचं समालोचन करत असताना, पीटरसनच्या उंचीबरोबर येण्यासाठी गावस्करांना चक्क बॉक्सवर उभं करण्यात आलं होतं. त्यावरून पीटरसननं सोशल मिडीयावर लिटल मास्टरना ट्रोल केलं. तर, नेटीझननंही यावर मजा घेत पीटरसन दादा, आमचे गावस्कर आता तुझ्याही पेक्षा उंच आहे, अशा शब्दात पीटरसनलाही ट्रोल केले. आणि हा मजेशीर फोटो पीटरसननं ट्विट केला.


POINTS TABLE:SCHEDULE TIME TABLE:ORANGE CAP:PURPLE CAP:RESULTS TABLE:VIDEO: सॅटेलाईट मिसाईल यंत्रणा म्हणजे नेमकं काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...