मालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान? गावस्कर संतापले

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियावर संतापले गावस्कर

  • Share this:

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. यावेळी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बेस्ट फिनिशर होत संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने 87 धावा करत भारताला वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना जिंकून देण्यात धोनीने महत्त्वाची भूमिका निभावली. धोनीने तिनही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतरही भारताचा माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी खेळाडूंना देण्यात आलेल्या पुरस्कारावरून नाराजी व्यक्त केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेच्या प्रसारण हक्काच्या विक्री आणि इतर माध्यमातून भरपूर पैसे मिळवले. मात्र मालिकावीर ठरलेल्या धोनीला अवघ्या 500 डॉलरचं बक्षीस दिल्यानं गावस्कर यांनी संताप व्यक्त केला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेच्या प्रसारण हक्काच्या विक्री आणि इतर माध्यमातून भरपूर पैसे मिळवले. मात्र खेळाडूंना पुरस्कार म्हणून फक्त 500 अमेरिकी डॉलर ( 35 हजार रुपये)दिल्याने गावस्कर संताप व्यक्त केला.

खेळाडूंमुळे आयोजकांना पैसा मिळतो. त्यामुळे योग्य रकमेचा पुरस्कार देणं हे आयोजकांचं कर्तव्य असल्याचे सुनिल गावस्कर म्हणाले.

विम्बल्डन चॅम्पियनशिप स्पर्धेत 2018 ला पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या खेळाडूला 36 लाख रुपये तर स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला 21 कोटी रुपये मिळाले होते. तर मग क्रिकेटपटूंच्या जीवावर कमाई करुनही त्यांना पुरस्कार देताना कंजुषपणा का केला जातो? असा प्रश्नही गावस्कर यांनी उपस्थित केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा टीकाकारांना उत्तर दिलं आहे. धोनीने सामन्याचा शेवट विजयाने करत मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि पुन्हा एकदा आपणच बेस्ट फिनिशर असल्याचं सिद्ध केलं. पाहूया त्याच्या पाच मॅच फिनिशर खेळी...

आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने ७४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करत भारताला वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.पुढे वाचा... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही

आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने ७४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करत भारताला ऐतिहासिक वनडे मालिका विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.पुढे वाचा... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही

श्रीलंकेविरुद्ध 2013 मध्ये तिरंगी मालिकेत तंदुरूस्त नसतानाही धोनीने नाबाद 45 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. मालिकेच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त झालेला धोनी अंतिम सामना जिंकून देण्यासाठी मैदानात उतरला होता. लंकेने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 3 बाद 139 वरून 7 बाद 152 अशी झाली होती. तेव्हा तळातील फलंदाजांच्या मदतीने त्याने भारताला 2 चेंडू राखून विजय मिळवून दिला होता.

भारत 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी पाकिस्तानने 288 धावांचे आव्हान दिले होते. सचिन तेंडुलकर वगळता भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. सचिन 95 धावांवर बाद झाल्यानंतर संघाची मदार युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीवर होती. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत 72 धावांची झंझावाती खेळी करताना युवराजसोबत 102 धावांची शतकी भागिदारी केली होती. भारताने हा सामना 5 गडी आणि 14 चेंडू राखून जिंकला होता.

भारत 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी पाकिस्तानने 288 धावांचे आव्हान दिले होते. सचिन तेंडुलकर वगळता भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. सचिन 95 धावांवर बाद झाल्यानंतर संघाची मदार युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीवर होती. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत 72 धावांची झंझावाती खेळी करताना युवराजसोबत 102 धावांची शतकी भागीदारी केली होती. भारताने हा सामना 5 गडी आणि 14 चेंडू राखून जिंकला होता.

सलामीचे फलंदाज गारद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन अनेक वेळा त्याने एका बाजूने खेळत सामना जिंकून दिला. 2012 मध्ये कॉमनवेल्थ बँक सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 44 धावांची खेळी करून भारताला सामना जिंकून दिला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. धोनीसोबत रवीचंद्रन अश्विन मैदानावर होता. यावेळी धोनीने 112 मीटर षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला होता.

1983 ला आयसीसी वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यासाठी 2011 ला सज्ज झाला होता. तेव्हाही धोनीनेच बेस्ट फिनिशरची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने 91 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्य़ाने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं होतं. पुढे वाचा...धोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही

1983 ला आयसासी वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यासाठी 2011 ला सज्ज झाला होता. तेव्हाही धोनीनेच बेस्ट फिनिशरची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने 91 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्य़ाने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचे नाव कोरलं होतं. पुढे वाचा...धोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'

मेलबर्नवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 230 धावांवर रोखले. भारताच्या युजवेंद्र चहलने या सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना बाद केले.

या सामन्यात चहलच्या गोलंदाजीवर शॉन मार्शला यष्टीचीत करुन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली.

शॉन मार्शला बाद करताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जास्त यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या 17 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

शॉन मार्शने याआधीच्या सामन्यात शतक केले होते. या सामन्यात त्याचा जम बसला असे वाटत असतानाच विराटने चहलच्या हातात चेंडू सोपवला. चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात शॉनला चेंडू कळला नाही आणि तो यष्टीचीत झाला.

इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धही सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्ध 16 आणि श्रीलंकेविरुद्ध 24 फलंदाज यष्टीचीत केले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 187 फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यातही त्याने सर्वाधिक 117 फलंदाजांना यष्टीचीत केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या