KBC मध्ये ‘हा’ प्रश्न का नाही विचारत? गावसकर यांनी घेतली बिग बींची फिरकी

KBC मध्ये ‘हा’ प्रश्न का नाही विचारत? गावसकर यांनी घेतली बिग बींची फिरकी

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अनेकदा क्रिकेटबाबत मजेशीर प्रश्न विचारले जातात.

  • Share this:

बंगळुरू, 23 सप्टेंबर : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अनेकदा क्रिकेटबाबत मजेशीर प्रश्न विचारले जातात. KBCच्या 11व्या हंगामात 7 कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नावरून तर सचिनही ट्रोल झाला होता. मात्र, आता लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी एका प्रश्नावरून अमिताभ बच्चन यांची फिरकी घेतली आहे.

बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळं भारताला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. दरम्यान यावेळी भारताची प्रथम फलंदाजी होत असताना, गावसकर यांनी एक मजेशीर प्रश्न विचारला. हा प्रश्न होता, भारतीय संघातील कोणत्या खेळाडूंनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी?. सुनील गावसकर यांनी हा प्रश्न खरतर KBCमध्ये विचारला गेला पाहिजे असे सांगितले. हा प्रश्न विचारताच गावसकर यांनी अमिताभ यांच्या अंदाजातच चार पर्याय दिले. हे पर्याय होते, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि केएल राहुल. अमिताभ यांच्या आवाजातील हा व्हिडिओ बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर केला.

वाचा-पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

चौथ्या क्रमांकाची मारामारी

वर्ल्ड कप 2019पासून टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याबाबत मारामारी सुरू आहे. ऋषभ पंतकडे योग्य पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, वर्ल्ड कपपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत पंतला एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यातही पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला होता. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघ निवडताना विराटला चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे पाहावे लागणार आहे.

कसा घेणार पंत धोनीची जागा

पंतने टी-20मध्ये 19 सामन्यात 20.40च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या पहिल्या 19 टी-20 सामन्यात 25च्या सरासरीने 310 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण पंत आणि धोनीच्या बाबत एक गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे या दोघांचा फलंदाजीला येण्याचा क्रम होय. पंत टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यास येतो तर धोनी तळाच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी येत असे. या फरकाशिवाय दोघांच्या टी-20 करिअरची कामगिरी समानच आहे. पंतचे आतापर्यंतचे करिअर आणि धोनीच्या सुरुवातीच्या करिअरची तुलना केल्यास दोघांच्या कामगिरीत फार मोठा फरक नाही. पण धोनीने प्रत्येक वर्षी त्याच्या खेळात सुधारणा केली. धोनीवर कधीच विकेट बेजबाबदारपणे गमवण्याचा आरोप झाला नाही. पंतच्या बाबत हाच मोठा आरोप केला जात आहे. जर धोनी प्रमाणेच पंतने देखील हा डाग बाजूला केल्यास तो महान खेळाडू होऊ शकेल.

वाचा-टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-विराटची एक चूक अन् टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारतानं गमावली मालिका

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या