वाचा-गावसकरांचं विराट आणि अनुष्काबाबत 'वादग्रस्त' विधान; सोशल मीडियावर चाहते भडकले अनुष्कानं व्यक्त केला संताप गावसकर यांनी केलेल्या टिपण्णीवर अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काने गावसकर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करीत अनुष्काने म्हटलं आहे की, “खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”.पुढे तिने म्हटलं आहे की, “मला खात्री आहे की माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करताना तुमच्याकडे इतर पर्यायी शब्द किंवा वाक्य उपलब्ध असतील. की त्यात माझं नाव जोडताना ते मर्यादित राहतात”, असे पोस्ट केले. मात्र आता चाहत्यांनी अनुष्काला गावसकर यांच्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, असे सांगितले आहे.Here is the video we all have been talking about. #Gavaskar #AnushkaSharma #ViratKohli @imVkohli @AnushkaSharma #ipl #rcb #SunilGavaskar pic.twitter.com/aCRtB6Pr2x
— Vishal Ghandat (@vishalghandat1) September 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, IPL 2020, Sunil gavaskar, Virat kohli