Home /News /sport /

...म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही, गावसकरांनी सांगितलं कारण

...म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही, गावसकरांनी सांगितलं कारण

महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर गावसकरांनी 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एवढे मोठे खेळाडू असूनही त्यांनी कधीच टीम इंडियाचा (Team India) प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जून : महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर गावसकरांनी 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एवढे मोठे खेळाडू असूनही त्यांनी कधीच टीम इंडियाचा (Team India) प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकात अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली, यामध्ये संदीप पाटील (Sandeep Patil), अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad), कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावाचा समावेश आहे, पण आपण प्रशिक्षक का झालो नाही, याबाबत गावसकरांनी खुलासा केला आहे. द एनालिस्ट या युट्युब चॅनलवर गावसकर बोलत होते. 'कोच म्हणून मी योग्य व्यक्ती नाही, कारण कोच किंवा सिलेक्टर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉल पाहावा लागतो. मी तुकड्या तुकड्यांमध्ये मॅच बघतो. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही मी पूर्ण मॅच बघायचो नाही. थोडा वेळ मॅच बघितल्यानंतर मी पुस्तक वाचायला किंवा आलेल्या पत्रांना उत्तर देण्यासाठी जायचो. मी कधीही गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे मामा माधव मंत्री यांच्यासारखा मॅचचा प्रत्येक बॉल बघायचो नाही,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. गावसकर टीमचे प्रशिक्षक झाले नसले तरी त्यांनी खेळाडूंना उपयोगी असा सल्ला नेहमीच दिला. सध्या मात्र ते खेळाडूंना बॅटिंग टिप्स देताना दिसत नाहीत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) जेव्हा टीममध्ये होते, तेव्हा गावसकर त्यांना नेहमीच बॅटिंगबाबत काही गोष्टी सांगायचे. सचिन आणि द्रविड यांनीही अनेकवेळा याबाबत सांगितलं आहे. 'जुन्या टीम इंडियाचे खेळाडू माझ्याकडे यायचे, खासकरून सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि सेहवाग. या खेळाडूंनी अनेकवेळा माझ्यासोबत चर्चा केली. मला त्यांच्याशी खेळाबाबत बोलायला आवडायचं. त्यांच्या खेळाबद्दल मला जे वाटायचं ते मी त्यांना सांगायचो. कदाचित माझ्या सल्ल्याचा त्यांना फायदा झाला असेल, पण मी पूर्णवेळ टीमचं कोचिंग करू शकत नाही,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Sunil gavaskar, Team india

    पुढील बातम्या