• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • 'मोदींना पंतप्रधान म्हणून घोषित करण्याआधी भाजपसुद्धा बैठक घेतं'...! कोहलीच्या कॅप्टन्सीवर भडकले गावस्कर

'मोदींना पंतप्रधान म्हणून घोषित करण्याआधी भाजपसुद्धा बैठक घेतं'...! कोहलीच्या कॅप्टन्सीवर भडकले गावस्कर

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar reacts on Virat Kohli captaincy) यांनी कोहलीच्या निमित्ताने BCCI आणि टीम सिलेक्शन कमिटीच्या (Team India Cricket Selection Committee) कारभारावरच कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: विराट कोहलीने (T20 Team India) T20 चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला (Virat Kohli quits captaincy) आणि त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर (Sunil Gavaskar reacts on Virat Kohli captaincy) यांनी या निमित्ताने BCCI आणि टीम सिलेक्शन कमिटीच्या (Team India Cricket Selection Committee) कारभारावरच कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये UAE मध्ये होणाऱ्या T20 World Cup स्पर्धेनंतर आपण भारतीय T-20 संघाची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराट कोहलीन Twitter पोस्ट करून जाहीर केलं. कोहली यानंतर T20 क्रिकेट टीममध्ये फलंदाज म्हणून खेळत राहणार आणि वनडे तसंच टेस्ट क्रिकेट संघाचं नेतृत्वही करत राहणार, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावरूनच सुनील गावस्कर यांचा पारा चढला आहे. BCCI च्या कार्यपद्धतीवरच त्यांनी आगपाखड केली. कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आणि रोहितचं काय झालं बोलणं? का सोडली कॅप्टन्सी? भारतीय संघात कोण खेळणार, कोण नेतृत्व करणार हे ठरवायला निवड समिती (Cricket Selection Committee) असते. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयानंतर एका खासगी वृत्तवाहिनीवर चर्चा करताना सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. BCCI आणि सिलेक्शन कमिटीने कित्येक वर्षांत कॅप्टन कोण हे ठरवण्यासाठी बैठकच घेतलेली नाही. किमान फॉरमॅलिटी म्हणून तरी एक बैठक बोलवून कर्णधाराचं नाव सुचवून ते निश्चित करण्यात यायला हवं होतं. काही सेकंदांची ही प्रक्रिया झाली असती तरी चाललं असतं, पण BCCI ने प्रक्रियेचा भाग म्हणून तरी किमान कर्णधार निवडीची मीटिंग करायला हवी होती. गेल्या 4 वर्षांत एकदाही BCCI ने ही प्रक्रिया पार पाडलेली नाही, असं गावस्कर यांचं म्हणणं आहे. रवी शास्त्रींनी फेटाळली BCCI ची विनंती, टीम इंडियाला मिळणार नवा हेड कोच गावस्कर यांनी उदाहरण देताना देशाच्या सर्वोच्च महत्त्वाच्या पदी असणाऱ्या पंतप्रधान मोदींचंच नाव घेतलं. "भाजपनेही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्याची फॉरमॅलिटी पूर्ण केली होती. त्यांनीही पंतप्रधान निवडीची बैठक घेऊन प्रक्रियेप्रमाणे मोदींचं नाव सुचवलं होतं. पण BCCI अशा प्रक्रिया जुमानतच नाही का?" असा सवाल गावस्कर यांनी उठवला. T20 World Cup: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... भारतीय टीमचा कर्णधार निवडण्यासाठी वेगळी बैठक घ्यायची पद्धत आहे. कर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याला सिलेक्शन कमिटीच्या बैठकीला आमंत्रित करण्यात येत असे. आधी तर कर्णधाराला सिलेक्शन कमिटीमध्ये मताचा अधिकारही नव्हता. फक्त त्यांचा विचार ऐकून घेतला जायचा. आता कर्णधाराला निवड प्रक्रियेत मोठं स्थान असतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: