मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारतातल्या T20 World Cup बद्दल हसीचं वक्तव्य, गावसकरांचं सडेतोड प्रत्युत्तर

भारतातल्या T20 World Cup बद्दल हसीचं वक्तव्य, गावसकरांचं सडेतोड प्रत्युत्तर

कोरोनाच्या स्थितीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबत (T20 World Cup) प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, त्यातच आता वर्ल्ड कपसाठी भारतात जाणं आता सुरक्षित नाही, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी (Michael Hussey) म्हणाला. हसीच्या या वक्तव्यावर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : कोरोनाच्या स्थितीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबत (T20 World Cup) प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, त्यातच आता वर्ल्ड कपसाठी भारतात जाणं आता सुरक्षित नाही, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी (Michael Hussey) म्हणाला. चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॅटिंग कोच असलेल्या माईक हसीला आयपीएल 2021 (IPL 2021) दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. माईक हसीने केलेल्या या वक्तव्यावर भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गावसकर यांनी माईक हसीला या वर्षाच्या सुरुवातीला भारताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India vs Australia) आठवण करून दिली. तसंच भारतात टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत वेळेआधी बोलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. गावसकर यांनी स्पोर्ट्स स्टारला लिहिलेल्या स्तंभामध्ये रोखठोक भूमिका मांडली.

'ऑस्ट्रेलियन लोकांना त्या शहरांमध्ये भारत दौऱ्याबाबत चिंता नव्हती, जिकडे कोरोना रुग्ण होते. जरी हजार रुग्णांच्या तुलनेत काही शे रुग्ण होते. भारताविरुद्धची सीरिज कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे होऊ नये, अशी मागणी ऑस्ट्रेलियात कोणीही केली नव्हती. मेलबर्नमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण असूनही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं,' असं गावसकर म्हणाले.

'त्या लोकांना समान सहानूभूतीबाबत विचारणा झाली पाहिजे, जे टी-20 वर्ल्ड कप भारताबाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ऑगस्ट अखेरपर्यंत स्थिती सुधारली नाही, तर वर्ल्ड कपचं आयोजन युएईमध्ये करावं. पण सध्या तरी याबाबत काही बोलू नये. या परिस्थितीमध्येही युएईने चांगल्या प्रकारे स्पर्धांचं आयोजन केलं, त्यामुळे वर्ल्ड कप आयोजनाची संधी मिळाली, तरी ते याचं चांगल्या पद्धतीने आयोजन करतील,' असं गावसकर त्यांच्या लेखात म्हणाले.

'ऑस्ट्रेलियाने भारताला वर्ल्ड कप आयोजनाची तेवढीच संधी द्यावी, जेवढी वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या देशाला स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिली होती,' असा टोलाही गावसकर यांनी लगावला.

First published:

Tags: Australia, Cricket, India, Sunil gavaskar, T20 world cup