• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • गावसकरांनी सांगितला टीम इंडियातला बदल, या खेळाडूच्या कमजोरीवर ठेवलं बोट

गावसकरांनी सांगितला टीम इंडियातला बदल, या खेळाडूच्या कमजोरीवर ठेवलं बोट

इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs England) चांगला ब्रेक मिळाला आहे. या काळात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) आपण केलेल्या चुका सुधारण्यासाठी मेहनत घेतील.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs England) चांगला ब्रेक मिळाला आहे. या काळात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) आपण केलेल्या चुका सुधारण्यासाठी मेहनत घेतील. भारतीय टीम सध्या 20 दिवसांच्या ब्रेकवर आहे. 14 जुलैला खेळाडू पुन्हा एकदा नॉटिंगहममध्ये एकत्र येतील. या दरम्यान भारतीय खेळाडू भटकंती करण्यासोबतच युरो कपची मॅच बघायलाही जाणार आहेत. भारतीय टीमला मागच्या तीन इंग्लंड दौऱ्यात ड्युक बॉलचा सामना करताना अडचण आली. 2007 साली भारतीय टीमने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती, त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कर्णधार होता. यानंतर 2011, 2014 आणि 2018 साली भारताचा 4-0, 3-1 आणि 4-1 ने पराभव झाला. यावेळी मात्र ही चूक दुरुस्त करण्यासाठी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे. या दौऱ्यात भारतीय टीम त्यांच्या ओपनरमध्येच बदल करू शकते, असं गावसकरांना वाटतं. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल, त्याआधी टीम इंडिया मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिलचा (Shubhaman Gill) फॉर्म इंट्रा स्क्वाड मॅचमध्ये बघतील. भारतीय टीम मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया सीरिजपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलसोबत खेळत आहे, पण गावसकर यांच्या मते 21 वर्षांच्या शुभमन गिलच्या तंत्रामध्ये काही त्रुटी आहेत. स्पोर्ट्स तकशी बोलताना गावसकर म्हणाले, 'मयंक अग्रवालने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. दोन वेळा त्याने ओपनिंग करत द्विशतक झळकावलं. इंग्लंड सीरिजआधी बीसीसीआयने काही सराव सामन्यांचा आग्रह धरला आहे, यातून गिल ओपनिंग करणार का अग्रवाल हे स्पष्ट होईल.' 'सराव सामन्यात गिल आणि मयंक या दोघांना ओपनिंगला पाठवलं जाऊ शकतं आणि रोहितला आराम दिला जाईल, यामुळे दोघांपैकी इंग्लंडच्या परिस्थितीत कोण चांगला खेळेल, याचा अंदाज येईल,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. 'गिलचं फूटवर्क ही त्याची समस्या आहे. फक्त फायनलमध्येच नाही तर घरच्या मैदानातही बॅटिंग करताना त्याचे पाय चालत नव्हते. भारतातही तो फक्त पुढे येऊन खेळला. बॅकफूटवर खेळण्याचा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही. जेव्हा तुम्ही पाय पुढे टाकता तेव्हा शॉर्ट बॉल आला तर संतूलन ठेवून बॅकफूटवर येणं कठीण असतं, यासाठी कठोर मेहनत करावी लागते. त्याच्या प्रतिभेबाबत काहीही संशय नाही, पण जर त्याने मेहनत केली तर त्याला फळ मिळेल,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.
  Published by:Shreyas
  First published: