Home /News /sport /

'त्याचं टीम इंडियात भवितव्य काय?', वारंवार निवड होणाऱ्या खेळाडूवर गावसकरांचं प्रश्नचिन्ह

'त्याचं टीम इंडियात भवितव्य काय?', वारंवार निवड होणाऱ्या खेळाडूवर गावसकरांचं प्रश्नचिन्ह

Sunil Gavaskar

Sunil Gavaskar

गेल्या काही वर्षात टीम इंडियाने फास्ट बॉलर्सचा (Team India) मोठा ग्रुप तयार केला आहे, त्यामुळे एखाद्या बॉलरला जरी दुखापत झाली तरी दुसरा त्याची जागा घ्यायला तयार असतो. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र टीम इंडियात होणाऱ्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 जानेवारी : गेल्या काही वर्षात टीम इंडियाने फास्ट बॉलर्सचा (Team India) मोठा ग्रुप तयार केला आहे, त्यामुळे एखाद्या बॉलरला जरी दुखापत झाली तरी दुसरा त्याची जागा घ्यायला तयार असतो. टीम इंडियात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असल्यामुळे अनेकांना बेंचवरच बसून राहायला सांगितलं आहे. एवढे पर्याय उपलब्ध असणं टीम इंडिया आणि निवड समितीसाठी चांगली डोकेदुखी असली तरी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) वारंवार होणाऱ्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केलं आहे. भुवनेश्वरला आराम देऊन युवा खेळाडूला संधी देण्याची मागणीही गावसकरांनी केली आहे. 'माझ्या मनात भुवनेश्वर कुमारचं नाव येत आहे. त्याचं नेमकं भवितव्य काय, याबाबतही मी साशंक आहे. त्याचा वेग आणि अचूकता कमी झाली आहे. याआधी इनिंगच्या सुरुवातीला स्विंगमुळे तो विकेट घ्यायचा, तसंच इनिंगच्या शेवटी रन रोखायचा, पण आता मात्र त्याने पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेटमध्ये जायची गरज आहे,' असं गावसकर स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाले. दीपक चहर (Deepak Chahar) भुवनेश्वर कुमारसारखाच बॉलर आहे, त्याचा बॉल दोन्ही बाजूंना स्विंग होतो, तसंच तो खालच्या क्रमांकावर चांगली बॅटिंगही करतो, त्यामुळे आता दीपक चहरचा विचार केला गेला पाहिजे, असं गावसकरांना वाटतं. 2019 वर्ल्ड कपनंतर भुवनेश्वर कुमारचा संघर्ष सुरू झाला आहे. तसंच त्याला दुखापतींनीही ग्रासलं आहे. दुखापतीमुळे आयपीएल 2020 च्या अर्ध्यातूनच त्याला माघार घ्यावी लागली. 2022 च्या आयपीएल आधी हैदराबादने भुवनेश्वर कुमारला रिलीज केलं आहे, त्यामुळे आता तो लिलावामध्ये उतरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Sunil gavaskar, Team india

    पुढील बातम्या