विराट कर्णधार होतोच कसा? गावसकर यांनी निवड समितीला घेतले फैलावर

विराट कर्णधार होतोच कसा? गावसकर यांनी निवड समितीला घेतले फैलावर

India vs West Indies : गावस्कर यांनी निवड समितीला फैलावर घेत संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे का दिले, असा सवाल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनेवर टीका केली होती. यानंतर गावसकर यांनी निवड समितीला फैलावर घेत संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे का दिले, असा सवाल केला आहे. गावस्कर यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीनं कोणतीही चर्चा न करता कोहलीची कर्णधारपदी फेरनियुक्ती केली असल्याचा आरोप केला आहे.

मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रात गावसकर यांनी लिहिलेल्या लेखात, "जर निवड समिती वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार निवडताना जर बैठक बोलावली नसले तर ही गोष्ट गंभीर आहे. याचा अर्थ विराट कोहली स्वत:ला हवा म्हणून कर्णधारपदावर कायम आहे किंवा निवड समिती खुश आहे", अशी टीका केली आहे. तसेच गावसकर यांनी, "माझ्या माहितीनुसार कोहलीची नियुक्ती वर्ल्ड कपसाठी करण्यात आली होती. यानंतर निवड समितीनं बैठक बोलवणे गरजेचे होते. ही गोष्ट वेगळी की, बैठका या केवळ पाच मिनिटे चालतात तरी, कर्णधारपदासाठी निवड समितीनं बैठक बोलावणे अपेक्षित होते.'', असेही आपल्या लेखात म्हंटले आहे.

दरम्यान, एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं वेस्ट इंडिज दौऱ्यात होणाऱ्या तिन्ही फॉरमॅटसाठी संघाती निवड केली. या दौऱ्याची सुरुवात अमेरिकेत दोन टी-20 सामन्यांपासून होणार आहे. मात्र निवड समितीवर ताशेरे ओडत, ''निवड समिती हाताच्या बाहुलीसारखी आहे. कर्णधारपदी फेरनियुक्ती केल्यानंतर कोहलीला संघ निवडण्यासाठी बोलावण्यात आले. संघातून केदार जाधव, दिनेश कार्तिक यांना डच्चू देण्यात आला. त्यांची कामगिरी निराशाजनक झाली होती, पण मग कोहलीलाही अपेक्षांवर खरं उतरता आलं नाही.'', असे मत व्यक्त केले. बीसीसीआयच्या निवड समितीच्या मते 2023च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने तीन्ही फॉरमॅटकरिता तीन वेगवेगळे संघ निवडले आहेत.

वाचा-टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा-टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

वाचा-रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

First published: July 29, 2019, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading