हे वागणं बरं नव्हे !, सुहास खामकर भारताऐवजी थायलंडकडून खेळला

गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या ऑलिम्पिया आशियाई स्पर्धेत सुहास का खेळला नाही याचं उत्तर सुहासकडे नाहीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2017 10:38 PM IST

हे वागणं बरं नव्हे !, सुहास खामकर भारताऐवजी थायलंडकडून खेळला

11 नोव्हेंबर : कोणत्याही खेळात देशाकडून खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण,नऊ वेळा भारत श्री राहिलेला सुहास खामकर याला अपवाद ठरलाय.

भारतीय बॉडीबिल्डिंगमध्ये प्रसिद्ध असलेला कोल्हापूरचा रांगडा गडी सुहास खामकर...सुहासने नऊ वेळा भारत श्री पटकावलाय. मध्यंतरी राज्य सरकारने सुहास खामकरच्या भरवी कामगिरीची दखल घेत पनवेलमध्ये नायब तहसिलदारपदी नियुक्ती केली होती. पण 50 हजारांची लाच घेतल्यामुळे त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.

पण आता सुहासने हाँगकाँगमध्ये झालेल्या अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत चक्क थायलंडकडून प्रतिनिधित्व केलं. विशेष म्हणजे भारताकडून अशी कोणतीही टीम थायलंडमध्ये पाठवण्यात आली नव्हती. तरी सुहासने या स्पर्धेत भाग घेतला आणि दुसरे स्थान पटकावले.

सुहासचं म्हणणंय की, आपण थायलंडकडून खेळलो पण मी देशाचंच प्रतिनिधित्व केलंय.

मात्र सुहाससारख्या वरिष्ठ खेळाडूने असं वागणं हा गुन्हा असल्याचं बॉडीबिल्डिंग संघटनेतर्फे बोललं जातंय.

Loading...

एक मात्र खरंय की, गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या ऑलिम्पिया आशियाई स्पर्धेत सुहास का खेळला नाही याचं उत्तर सुहासकडे नाहीये.

सुहास आणि संघटनेतला नेमका वाद हा पुढे समजेलच मात्र अशा घटनांचा खेळावर काय परिणाम होईल याचा मात्र विचार करायची वेळ आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...