मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटर नवऱ्यासाठी अँकर पत्नीचा दिसला आक्रमक अंदाज, Trollersना केलं क्लीन बोल्ड!

क्रिकेटर नवऱ्यासाठी अँकर पत्नीचा दिसला आक्रमक अंदाज, Trollersना केलं क्लीन बोल्ड!

मयंतीच्या या फोटोवरून काही नेटिझन्सने बिन्नीला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

मयंतीच्या या फोटोवरून काही नेटिझन्सने बिन्नीला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

मयंतीच्या या फोटोवरून काही नेटिझन्सने बिन्नीला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

    मुंबई, 08 फेब्रुवारी: आपल्या पतीच्या रक्षणासाठी पत्नी नेहमीच धावून येत असते. सेलिब्रिटी पत्नीही यामध्ये मागे नसल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. अशाच एका घटनेत आपल्या पतीसाठी सेलिब्रेटी अँकर धावून आली आहे. नुसतीच धावून आली नाही तर, तिनं आपल्या पतीची बाजूही चांगलीच संभाळली आहे. नेहमीप्रमाणे नेटिझन्सने भारतीय खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरला ट्रोल केलं. झालं असं की, अँकर मयंती लँगरने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला. या फोटोला तिनं सुंदर कॅप्शनही दिलं. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेदरम्यानचा मयंतीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये मयंती आपल्या अँकरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. कलरफुल लाईट्स असलेल्या स्टुडिओमध्ये मयंतीने हा फोटो क्लिक करून तिने सोशल मीडियावर अपलोड केला. यावेळी, It’s a rather colourful life in our studio असं फोटोला कॅप्शन दिलं. दरम्यान, मयंतीच्या या फोटोला चाहत्यांनी पसंतीही दिली. परंतु, मयंतीच्या या फोटोवरून काही नेटिझन्सने बिन्नीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. (हेही वाचा : चहलचं वनडेमध्ये 177 दिवसानंतर कमबॅक, 10 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी!) असं केलं ट्रोल मयंती लँगर क्रिकेट विश्वातील एक ग्लॅमरस अँकर असून ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. मयंतीने नेहमीप्रमाणे आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मयंतीच्या या फोटोवर ‘सध्या स्टुअर्ट बिन्नी कुठे आहे?’, असा सवाल एका अकाऊंटवरून विचारण्यात आला. दरम्यान, ‘तो तिचे बॅग सांभाळण्यासाठी मदत करत आहे’, असं म्हणत एका ट्रोलरने बिन्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मयंतीने या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं. ‘मी माझे बॅग स्वत: सांभाळू शकते. तुमचे खूप-खूप आभार! तो स्वत:चं आयुष्य जगण्यात व्यस्त आहे, क्रिकेट खेळत आहे. आणि अनोळखी व्यक्तींच्या कॉमेंट्सवर प्रतिक्रिया देत नाही’, अशा शब्दात मयंतीने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. अशी आहे बिन्नीची कामगिरी स्टुअर्ट बिन्नीने जानेवारी, 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर, ऑगस्ट, 2016 रोजी अखेरचा सामना खेळला आहे. आपल्या गोलंदाजीमुळे बिन्नीने अल्पवधीतच प्रसिद्धी मिळवली होती. 2014मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 4.4 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत 6 विकेट्स मिळवल्या होत्या. यावेळी बिन्नीच्या 2 ओव्हर या मेडन होत्या. सध्या बिन्नी रणजी ट्रॉफीमध्ये नागालँडसाठी खेळत आहे. (हेही वाचा : India vs New Zealand 2nd ODI: टीम इंडियाचा पराभव, 22 धावांनी न्यूझीलंडचा विजय) (हेही वाचा : भारतीय खेळाडूंच्या या 5 चुका ठरल्या मानहानीकारक पराभवाचं कारण)
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या