मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

निवृत्त झाल्यानंतर लगेच स्टुअर्ट बिन्नी सुरू करणार नवीन काम!

निवृत्त झाल्यानंतर लगेच स्टुअर्ट बिन्नी सुरू करणार नवीन काम!

निवृत्तीनंतर बिन्नीची नवी इनिंग

निवृत्तीनंतर बिन्नीची नवी इनिंग

भारताचा ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याने सोमवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 37 वर्षांच्या बिन्नीने 2003 साली कर्नाटककडून पदार्पण केलं होतं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : भारताचा ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याने सोमवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 37 वर्षांच्या बिन्नीने 2003 साली कर्नाटककडून पदार्पण केलं होतं. यानंतर त्याला भारताकडून 6 टेस्ट, 14 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळण्याची संधी मिळाली. स्टुअर्ट बिन्नी बहुतेक काळ स्थानिक क्रिकेट कर्नाटककडूनच खेळला, पण 2 मोसम तो नागालँडकडून खेळण्यासाठी गेला. तसंच तो बंद पडललेल्या आयसीएलमध्येही खेलला. 2013-14 साली कर्नाटकला रणजी चॅम्पियन बनवण्यात त्याचं योगदान मोलाचं आहे. त्या मोसमात बिन्नीने 443 रन केले आणि 14 विकेट घेतल्या.

1983 वर्ल्ड कप विजेत्या रॉजर बिन्नी यांचा मुलगा असलेला स्टुअर्ट आता निवृत्तीनंतर कोचिंग करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्टुअर्टने हे सांगितलं. मी कोचिंग द्यायला आधीपासूनच सुरुवात केली आहे. नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये (NCA) मी लेव्हल 2 पूर्ण केली आहे. मी फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडर्सना कोचिंग आणि ट्रेनिंग द्यायचा विचार करतोय, असं बिन्नी म्हणाला.

यंत्रणा समजण्यााठी मी 2 वर्ष इशान्य भारतात होतो, तिकडे खूप टॅलेंट आहे, पण त्यांना खेळायला मिळत नाही. त्या क्षेत्रात क्रिकेटचं पुनरागमन करण्याचं माझं लक्ष्य आहे. स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी मी त्यांची मदत करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्टुअर्ट बिन्नीने दिली.

First published: