भावाच्या आत्महत्येचं दु:ख उराशी बाळगून तो खेळला आणि त्यानं जिंकलं! IPL 2021 च्या नव्या सुपरस्टारची कहाणी

भावाच्या आत्महत्येचं दु:ख उराशी बाळगून तो खेळला आणि त्यानं जिंकलं! IPL 2021 च्या नव्या सुपरस्टारची कहाणी

चेतन साकारिया या राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएल क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या या अवघ्या 22वर्षांच्या खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा (IPL 2021) सध्या सुरू आहे. या स्पर्धेतल्या काही खेळाडूंकडून कोरोनाच्या भीषण परिस्थितीत प्रेरणाही मिळत आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे चेतन साकारिया. राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएल क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या या अवघ्या 22वर्षांच्या खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'तो आला, त्याने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं'असंच काहीसं त्याच्या बाबतीत झालंआहे. अलीकडेच, जानेवारी महिन्यात त्याच्या आयुष्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे त्याला खूप मोठा मानसिक धक्का सहन करावा लागला होता. तरीही त्यातून बाहेर येऊन त्याने केलेल्या कामगिरीमुळे सगळे जण प्रभावित झाले आहेत. 'क्रिकॅडियम डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

चेतन साकारिया (Chetan Sakariya) इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. त्याच दरम्यान, 14जानेवारी रोजी त्याचा धाकटा भाऊ राहुल याने आत्महत्या केली. साहजिकच त्यांचं सारं कुटुंब अत्यंत दुःखी,उद्विग्न आणि निराश मानसिकतेत होतं. तरीही त्यांनी प्रचंड धीर बाळगून चेतनला याबद्दल काही कळवलं नाही. कारण या वृत्ताचा त्याच्या खेळावर परिणाम झाला असता. ती स्पर्धा संपल्यानंतर, म्हणजे 10 दिवसांनी त्याला ही दुःखद गोष्ट सांगण्यातआली.

चेतनची बहीण जिग्नाशा म्हणाली, 'आम्ही चेतनचे प्रशिक्षक आणि मित्रांना विनंती केली होती, की त्याला ही गोष्ट आधी कळू देऊ नये. कारण त्याचं लक्ष विचलित होईल. त्यामुळे तो स्पर्धेनंतर घरी आल्यावरच त्याला ही गोष्ट सांगण्यात आली.'

(हे वाचा-IPL 2021 : कृणाल पांड्यासोबतच्या वादामुळे निलंबन, धडाकेबाज अर्धशतकाने कमबॅक)

चेतनने इंजिनीअर व्हावं, असं त्याच्या वडिलांना वाटत होतं; पण त्याच्या मनात मात्र काही वेगळंच चाललं होतं. त्याने क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने तो कसून प्रयत्नही करत होता. त्याच्या प्रयत्नांचं फळ त्याला मिळालं. आयपीएल स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 1.2 कोटी रुपयांना खरेदी केलं. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून त्याने इथपर्यंतची वाटचाल केली आहे.

त्याची बहीण जिग्नाशाने डेक्कन क्रॉनिकलला सांगितलं, 'आयपीएलमध्ये निवड होणं हे माझा भाऊ चेतनला त्याच्या 23व्या वाढदिवसाच्या 10 दिवस अगोदर मिळालेलं वाढदिवसाचं गिफ्टच आहे. त्याने आम्हाला कोलकात्याहून फोन केला आणि आपण करोडपती झाल्याचं सांगितलं होतं.'

(हे वाचा-IPL 2021, MI vs KKR : मुंबईची लढत कोलकात्याशी, रोहित या खेळाडूंना देणार संधी!)

ती पुढे असं म्हणाली की, 'माझ्या लहान भावाने आत्महत्या केल्यामुळे आमच्या घरात दुःखाचं वातावरण आहे. त्यातून आम्ही अद्याप बाहेर आलेलो नाही. त्याच वेळी मोठ्या भावाला आयपीएलचं काँट्रॅक्ट मिळालं आहे. त्यामुळे भावना नेमक्या कशा व्यक्त करू हे कळत नाहीये.'

चेतन साकारियाने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरोधात झालेल्या सामन्यातून आयपीएलमध्ये शानदार पदार्पण केलं. 31धावांच्या बदल्यात त्याने तीन गडी बाद केले आणि त्याचा इकॉनॉमी रेट 7.75 होता. के. एल. राहुल सारख्या फटकेबाजी करणाऱ्या स्थिरावलेल्या बॅट्समनसह चेतनने पंजाब किंग्जच्या दोन्ही ओपनिंग बॅट्समनना तंबूत पाठवलं.

गुजरातमधला लेफ्ट आर्म स्विंग बॉलर (Left Arm Swing Bowler) असलेल्या चेतनने 2018-19 मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मार्च 2020मध्ये सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली. त्या विजयी संघात चेतनही होता. 2020च्या आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा नेट बॉलर होता; मात्र आयपीएल साठी करारबद्ध होऊन अंतिम 11 (Playing XI) खेळाडूंमध्ये निवड होण्याचं त्याचं यंदा पहिलंच वर्ष. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्याने क्रिकेटचं कोणतंही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नव्हतं. लहानपणापासून टेनिस बॉलेने क्रिकेट खेळत खेळत त्याने स्वतःचं कौशल्य विकसित केलं, असं ईएसपीएनच्या बातमीत म्हटलं आहे.

First published: April 13, 2021, 4:19 PM IST

ताज्या बातम्या