स्मिथचा 'सुपर कॅच' पाहून झाली धोनीची आठवण, फलंदाजही अवाक्; पाहा VIDEO

स्मिथचा 'सुपर कॅच' पाहून झाली धोनीची आठवण, फलंदाजही अवाक्; पाहा VIDEO

स्मिथने हवेत झेप घेत घेतलेल्या कॅचवर फलंदाज केन विल्यम्सनचाही विश्वास बसला नव्हता. काही क्षण तो मैदानावरच थांबला होता.

  • Share this:

पर्थ, 14 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया न्यूझिलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मिशेल स्टार्कने भेदक मारा केला. या जोरावर ऑस्ट्रेलियानं सामन्यावर पकड मिळवली आहे. स्टार्कच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने सूर मारून घेतलेल्या कॅचची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्याने विल्यम्सनचा 34 धावांवर झेल टिपला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या 5 बाद 109 धावा झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्युशेनच्या 143 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 416 धावा केल्या. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 307 धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडची भिस्त आता रॉस टेलरवर आहे. त्याने विल्यम्सनसोबत 76 धावांची भागिदारी केली होती.

स्टार्कच्या गोलंदाजीवर विल्यम्सनचा अप्रतिम असा झेल स्मिथने घेतला. बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू स्मिथने हवेत लांब सूर मारून झेलला. त्याच्या या कॅचमुळे सामन्याचे चित्र पालटले. त्यानंतर न्यूझीलंडचे 3 फलंदाज 20 धावांमध्ये परतले आणि त्यांची धावसंख्या 5 बाद 97 अशी झाली.

स्मिथने घेतलेला झेल पाहून विल्यम्सनही चक्रावला. बाद झाल्यानंतर काही वेळ तो मैदानावरच उभा होता. स्मिथने घेतलेल्या या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने म्हटलं की, स्मिथ फक्त फलंदाज म्हणून नाही तर क्षेत्ररक्षक म्हणूनही महान आहे. असं खूप कमी खेळाडूंमध्ये बघायला मिळतं. यातच काही चाहत्यांनी स्मिथच्या व्हिडिओवर धोनीच्या कॅचचा व्हिडिओही शेअर केला आहे.

वर्ल्ड कपनंतर मैदानावर न उतरलेल्या धोनीने वर्ल्ड कपवेळी घेतलेल्या कॅचचा हा व्हिडिओ आहे. अद्याप धोनीने तो कधी पुनरागमन करणार याबद्दल सांगितलेलं नाही.

स्पर्धेवेळीच काढून घेतलं होतं कर्णधार पद, IPL च्या इतिहासातले 3 धक्कादायक निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या