मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

स्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक!

स्टीव्ह स्मिथने निवडले जगातले 4 बेस्ट फास्ट बॉलर, हा भारतीय सगळ्यात धोकादायक!

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी करण्यासोबतच तो टी-20 क्रिकेटमध्येही धमाकेदार बॅटिंग करतो.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी करण्यासोबतच तो टी-20 क्रिकेटमध्येही धमाकेदार बॅटिंग करतो. टेस्ट क्रिकेटमध्ये 7 हजारांपेक्षा जास्त रन करणाऱ्या या खेळाडूसमोर बॉलिंग करताना अनेक बॉलर्सना अडचणींचा सामना करावा लागतो. असं असलं तरी स्मिथलाही काही बॉलर्ससमोर खेळणं कठीण जातं. एका वेबसाईसोबत बोलताना स्मिथने याबाबत खुलासा केला.

सध्याच्या काळातला सर्वोत्तम बॉलर कोण आहे, असा प्रश्न स्मिथला विचारण्यात आला, तेव्हा त्याने 4 बॉलर्सची नावं घेतली. यामध्ये भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इंग्लंडचा जेम्स अंडरसन (James Anderson), दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा (Pat Cummins) समावेश आहे. सध्या हे 4 बॉलर जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहेत. स्मिथने नावं घेतलेले चारही खेळाडू फास्ट बॉलर आहेत.

स्मिथने नाव घेतलेल्या खेळाडूंमध्ये जेम्स अंडरसन सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे. अंडरसनचं वय सध्या 39 वर्ष आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अंडरसनला 4 विकेट मिळाल्या. या इनिंगमध्ये अंडरसनने अनिल कुंबळेच्या 619 टेस्ट विकेटचा विक्रमही मोडीत काढला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर तो याआधीच झाला आहे. जसप्रीत बुमराहने मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 5 आणि पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या.

31 वर्षांच्या स्टीव्ह स्मिथच्या कोपराला दुखापत झाली आहे. या कारणामुळे तो क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये तो अखेरचा मैदानात दिसला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) स्मिथ 6 मॅच खेळला, पण त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. आयपीएल दरम्यान स्मिथची दुखापत वाढली, त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. या कारणामुळे स्मिथ वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही.

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. ऑस्ट्रेलियाची टी-20 मधली कामगिरीही निराशाजनक सुरू आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला, त्यामुळे स्मिथ लवकर फिट व्हावा, असं ऑस्ट्रेलियन टीमला वाटत असेल.

First published: