मेलबर्न, 02 जानेवारी: भारतीय क्रिकेट संघातील (Team india) काही खेळाडूंनी कोरोना नियमाचं उल्लंघन (Broke coronavirus rules) करत मेलबर्न (melbourne) येथील एका रेस्टॉरंटमध्ये (Restaurants) जेवण केल्याचं वृत ऑस्ट्रेलियातील मीडियाने (Austrelian media) दिलं होतं. आंतराष्ट्रीय स्तरावर याबाबत अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. आता BCCI ने याप्रकरणी मौन तोडलं असून त्यांनी ऑस्ट्रेलिया मीडियानं दिलेलं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं खेळाडूंनी नियम तोडल्याच्या बातमीला एक नवा ट्वीस्ट आला आहे.
BCCI ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या एका समूहाने भारतीय संघातील खेळाडूंबद्दलची दिलेली बातमी निराधार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय संघ कोविड -19 नियमांविषयी चांगलाच जागरुक आहे. त्यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. 'टीम इंडियाच्या खेळाडूंनी जैविक दृष्ट्या सुरक्षित नियमांचं कोणतही उल्लंघन केलं नाही. संघाशी संबंधित असलेला प्रत्येक व्यक्ती कोरोना नियमांबद्दल चांगल्या प्रकारे परिचित आहे.
बीसीसीआय (BCCI) ने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचीही बातमी माध्यमांमध्ये आली होती. नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन करताना दिसलं, असं या बातमीत म्हटलं होतं.
नवलदीप सिंह नावाच्या एका चाहत्यांनं ट्वीट करून ही अफवा पसरवली होती. त्यानं भारतीय संघातील खेळाडूंच्या जेवनाचं बिलही भरल्याचा दावा केला. तसेच यावेळी रिषभ पंतला मिठी मारली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. पण या त्याच्या चुकीचा भारतीय संघाला होणारा त्रास पाहता त्यानं ट्वीटरवर माफी मागितली आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मी त्यांना भेटलो मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन केलं आहे. रिषभने मला मिठी मारली ही बाब मी भावनेच्या भरात म्हटलं असल्याचंही नवलदीपनं म्हटलं आहे.
Bc mere saamne waale table par gill pant sharma saini fuckkkkkk pic.twitter.com/yQUvdu3shF
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
त्यामुळं एकंदरीत खेळाडूंनी कोणतेही बायो सिक्युरीटीचे कोणतेही नियम तोडले नाहीत. खेळाडूंना बाहेर हॉटेलमध्ये खाण्याची परवानगी असून त्यासाठी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं कडक पालन करणं अपेक्षित आहे. खेळाडूंनी यावेळी कोरोना नियमांचं पालन केलं असून ऑस्ट्रेलियन मीडियानं दिललं वृत निराधार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india