S M L

सोनीला मागे टाकत स्टारनं मिळवले आयपीएलचे हक्क

सोनी, स्टार इंडिया, फेसबुक, ट्विटर, जिओ यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 02:20 PM IST

सोनीला मागे टाकत स्टारनं मिळवले आयपीएलचे हक्क

मुंबई, 04 सप्टेंबर: आयपीएलच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाला मिळालेत. २०१८-२०२२पर्यंत आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क स्टारकडे असणार आहेत. पाच वर्षांच्या प्रक्षेपणासाठी स्टारनं १६ हजार ३४७ कोंटींची बोली लावली होती. स्टारची बोली सर्वाधिक असल्यामुळे त्यांना हक्क देण्यात आलेत. सोनीला मागे टाकत स्टारनं आयपीएलचे हक्क मिळवलेत.

स्टारनंतर सोनीनं दुसऱ्या क्रमांकाची बोली लावली होती. सोनीनं ११,०५० कोटींची बोली लावली होती.तर डिजीटल हक्कांसाठी फेसबुकनी ३,९०० कोटींची बोली लावली होती.

2008 मध्ये सोनीने जवळपास 8 हजार कोटींना 10 वर्षांसाठी हक्क विकत घेतले होते. हे हक्क 2018 ते 2022 अशा 5 वर्षाच्या कालावधीसाठीच विकले जाणार आहेत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 11:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close