तर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोनं जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई- बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. तसेच त्यांनी जुळ्या मुलांबाबत पोस्ट शेअर करून एक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, "आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहे." फुटबॉलपटू रोनाल्डोला 11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. यानंतर त्याच्या घरात आणखी एका नवीन पाहुण्याचा जन्म झाला आहे. हेही वाचा - IPL 2022 : चहलची हॅट्रिक, बटलरचं शतक, राजस्थानचा KKR वर रोमांचक विजय हॉटेल्स, जिम आणि टेक कंपनीचा मालक आहे रोनाल्डो - पोर्तुगलचा (Portugal) स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) जगभरात असंख्य चाहते आहेत. मैदानात त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावरही (social media) रोनाल्डोचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची (fan followers ) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रोनाल्डोचा खेळातील प्रवास तुम्हाला माहितच असेल मात्र त्याच्या बिझनेसबद्दल फार लोकांना माहिती नाही. रोनाल्डो फुटबॉलशिवाय (football) सोशल मीडियावरून देखील पैसे कमवतो. एवढंच नव्हे तर रोनाल्डोची अनेक हॉटेल्स (hotels), जिम (gym) असून त्याची एक टेक कंपनीदेखील (tech company) आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.