IPL 2019 : कोलकाताच्या विजयानंतर मालक शाहरुख खान असं काही म्हणाला की...

KKRनं 5 पैकी 4 सामने जिंकत अंकतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 12:34 PM IST

IPL 2019 : कोलकाताच्या विजयानंतर मालक शाहरुख खान असं काही म्हणाला की...

कोलकाता, 08 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची सध्या विजयी घौडदौड सुरू आहे. 5 पैकी 4 सामने जिंकत अंकतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यामुळं आपल्या संघाच्या या कामगिरीवर कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान खेळाडूंवर भलताच खुश आहे.

कोलकताच्या फलंदाजीनं सगळ्याच संघातील गोलंदाजांची झोप उडवली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सला अगदी सहज नमत कोलकाता पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. शाहरुख आपल्या संघाची तारीफ करायला कमी करत नाही, तो नेहमीत खेळाडूंच्या खेळाची प्रशंसा करत असतो. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलनं केलेल्या धडाकेबाज फलंदाजीची दखल घेत शाहरुखनं त्याला आपल्या संघाचा बाहुबली असं नाव दिलं होतं. आता रविवारी राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवल्यानंतर खेळाडूंचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.


Loading...


या ट्विटमध्ये शाहरुखनं, ‘’तुम्ही शानदार खेळाडू आहेत. ख्रिस लीन आणि सुनील नरेन तुम्हाला तर तोड नाही. रॉबीन उथप्पा तुझी स्टाईल लाजवाब आहे. गोलंदाज कमाल आहे. कर्णधार दिनेश कार्तिक ती खुप छान सांभाळतो आहेत, लवकरच भेटू’’ , असे लिहीत कोलकाताच्या खेळाडूंची तारिफ केली. तर, शाहरुखच्या या ट्विटवर थॅक्यू बॉस, तुम्ही आम्हाला भावूक केले असा रिप्लाय खेळाडूंनी दिला आहे.कोलकाताच्या खेळीकडं आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण KKRनं प्ले ऑफमधले आपलं स्थान पक्के केले आहे. दरम्यान याआधी KKRनं 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहेत. त्यामुळं आता तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यासाठी कोलकाता सज्ज आहेत.


बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...