थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

भारताच्या युवा क्रिकेटपटूनं एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी केली तरीही निवडसमितीचं त्याच्याकडे लक्ष जाईल की नाही हे माहिती नसल्याचं ट्विट काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यानं 2015 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध टीम इंडियातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर मात्र त्याला संधी मिळाली नाही. आयपीएलमध्येही त्यानं धमाकेदार कामगिरी करताना दोन शतकं केली आहेत. तरीही त्याला आतापर्यंत भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना एकदिवसीय सामन्यात 212 धावांची तुफान फटकेबाजी केली. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

संजू सॅमसनच्या या खेळीनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी संजू सॅमसनचे कौतुक करताना त्याला तिरुवनंतपुरमचा म्हटल्यानं श्रीसंत नाराज झाला आहे. शशी थरूर यांनी ट्विटरवर म्हटलं की, फ्रँकफुर्टमध्ये बेलग्रेड इथं होणाऱ्या बैठकीला जात असतानाच मला बातमी मिळाली की तिरुवनंतपुरमच्या आपल्या संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक केलं आहे. मला नाही माहिती की आता तरी तुझ्याकडे निव़डसमिती लक्ष देईल.

या ट्विटनंतर भारताचा क्रिकेटपटू एस श्रीसंतने नाराजी व्यक्त केली आहे. श्रीसंतने थरूर यांना आठवण करून देताना म्हटलं की,'सर, त्याला फक्त तिरुवनंतपुरमचा म्हणू नका. तो मल्याळमचा गौरव वाढवणारा पुत्र आणि महान भारतीय आहे. त्यानं आपल्याला अभिमान वाटावा अशीच कामगिरी केली आहे.

विजय हजारे ट्रॉफीत केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर विरुद्ध संघाच्या गोलंदाजीची संजू सॅमसनने अक्षरश: पिसं काढली. त्यानं फक्त 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं 212 धावा केल्या. केरळने 50 षटकांत 3 बाद 377 धावा केल्या. केरळने हा सामना 104 धावांनी जिंकला.

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

First published: October 14, 2019, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading